शिवसेनेचा प्रचार भोवला, या पदाधिकाऱ्यांची भाजपातून हकालपट्टी, पहा संपूर्ण यादी 

सिंधुदुर्ग
Updated Oct 16, 2019 | 15:11 IST | टाइम्स नाऊ मराठी

कणकवलीत भाजपच्या चार जणांनी शिवसेनेचा प्रचार केल्यामुळे त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली आहे. 

vidhansabha election 2019 bjp shiv sena 4 memeber expel from party by bjp news in marathi
शिवसेनेचा प्रचार भोवला, या पदाधिकाऱ्यांची भाजपातून हकालपट्टी 

कणकवली :  महाराष्ट्र विधानसभेसाठी भाजप-सेना युती असली तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. त्यात आताची एक मोठी बातमी कणकवलीत विधानसभा मतदार संघातून येत आहे. कणकवलीत भाजपच्या चार जणांनी शिवसेनेचा प्रचार केल्यामुळे त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली आहे. 

पक्षाची शिस्तभंग केल्याचा ठपका ठेऊन आणि शिवसेनेचा कणकवली मतदार संघात प्रचार केल्याचा आरोप करत संदेश पारकर, अतुल रावराणे, लक्ष्मण रावराणे आणि संदेश पटेल या चौघांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती प्रमोद जठार यांनी माध्यमांना दिली आहे. 

कणकवलीत भाजप-सेना आमने सामने आहे.  भाजपमध्ये नुकतेच दाखल झालेले नितेश राणे आणि शिवसेनेकडून सतीश सावंत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नितेश राणे हे भाजपमधून निवडणूक लढवत असल्याचे अनेक भाजप कार्यकर्त्यांना रुचलेले नाही. त्यामुळे त्यांनी भाजप ऐवजी शिवसेनाचा प्रचार करणे सुरू केले आहे. त्यामुळे हे भाजपच्या शिस्तीचा भंग असल्याचे मत भाजपतील जिल्ह्यातील नेत्यांनी म्हटले आहे. 

व्यक्तिगत नैराश्य, द्वेष अशा शूद्र हेतूने जे लोक टार्गेट करत आहेत हे भाजपा पक्ष विचारांना धरून नाही. पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही त्यामुळे पक्ष विरोधी काम करणाऱ्या अतुल रावराणे आणि संदेश पारकर यांच्यावर पक्ष कारवाई करणार असा इशारा भाजपा प्रदेश सचिव तथा आमदार मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेत एक प्रश्नाला उत्तर देताना दिला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे समजते आहे. 

आज कणकवली उद्धव ठाकरे यांची सभा आहे. त्यामुळे हे चौघैे जण या सभेला उपस्थित राहतात का, किंवा शिवसेनेते प्रवेश करतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

भाजपातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केले भाजप पदाधिकारी 

  1. संदेश पारकर, 

  2. अतुल रावराणे, 

  3. लक्ष्मण रावराणे 

  4. संदेश पटेल 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी