संघाच्या शाखेत गेल्यावर झालेल्या ट्रोल फोटोवर नितेश राणे पहिल्यांदा बोलले असं काही... 

सिंधुदुर्ग
Updated Oct 09, 2019 | 15:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

vidhansabha election 2019 :  सध्या सोशल मीडियावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे ट्रोल होत आहेत.

vidhansabha election 2019 nitesh rane bjp kankavali vaibhavwadi rss shakha troll on social media news in marathi
संघाच्या शाखेत गेल्यावर झालेल्या ट्रोल फोटोवर नितेश राणे पहिल्यांदा बोलले असं काही...  

कणकवली :  सध्या सोशल मीडियावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे ट्रोल होत आहेत. या ट्रोल झालेल्या फोटोमध्ये नितेश राणे संघाच्या शाखेत एका सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे बसलेले दिसत आहेत. या फोटोवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भाष्य केले होते. त्यावर पहिल्यांदा नितेश राणे यांनी भाष्य केले आहे. 

नितेश राणे वैभववाडी येथील संघ शाखेत गेले होते. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो खूप व्हायरल झाला आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. 

नितेश राणे ज्यांना माहिती आहे, त्याला जे ओळखतात, ते अशा प्रकारे ट्रोल करू शकत नाही.  मला महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणात वर्ग ओळखतो, तो वर्ग का विचार करतो त्याचा मला फरक पडतो.  तसेच ज्या पक्षात मी प्रवेश केला आहे त्या पक्षाची मातृ संघटनेला  जाणून घेण्यासाठी मी संघाच्या शाखेत गेलो होतो. त्यामुळे पक्षाची धैय धोरणे समजून घेण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो असल्याचे नितेश राणे यांनी मान्य केले.  

त्या संघटनेबाबत माझ्याकडे असलेली माहिती आणि त्यांच्याकडे असलेली माहिती या संदर्भात संवाद साधणे गरजेचे होते. ती संधी या निमित्ताने मिळाली होती. त्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी एक सकात्मक दृष्टीने त्या ठिकाणी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्टीकरण नितेश राणे यांनी या ट्रोल होणाऱ्या फोटो संदर्भात दिले आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचा पहिला आमदार हा कणकवलीतून येणार यावर बोलताना नितेश राणे म्हणाले, शिवसेना माझ्यासमोर आव्हान असल्याचे मला वाटत नाही. बेरोजगारी हे माझ्यासमोरचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे त्याकडे मी जास्त लक्ष देत नाही. उद्धव ठाकरे एका पक्षाचे प्रमुख आहे. त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा असे वाटत असले, त्यात काही गैर नाही. तुम्ही मुख्यमंत्री फडणवीस किंवा चंद्रकांतदादांना विचारले तर ते म्हणतील भाजपचा उमेदवार कणकवलीतून निवडून यायला पाहिजे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची अपेक्षा काही गैर नाही, असा समजदारपणा नितेश राणे यांनी यावेळी आपल्या बोलण्यातून दाखवला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...