[video] जेवण करत असताना पोलिसांनी राणेंना केली धक्काबुक्की - लाड यांची माहिती 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेवण करत असताना पोलीस धडकले आणि त्यांनी राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.

While eating, the police pushed Rane
जेवण करत असताना पोलिसांनी राणेंना केली धक्काबुक्की - लाड  
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेवण करत असताना पोलीस धडकले आणि त्यांनी राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे.
  • नारायण राणे यांना संगमेश्वर जवळील गोळवली गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका खासगी रेस्ट हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. 
  • संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांना नेण्यात आल्यानंतर राणे समर्थकांनी बाहेर जोरदार घोषणाबाजी केली.

संगमेश्वर : केंद्रीय मंत्री नारायण राणे हे जेवण करत असताना पोलीस धडकले आणि त्यांनी राणेंना धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. नारायण राणे यांना संगमेश्वर जवळील गोळवली गावात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका खासगी रेस्ट हाऊसमधून ताब्यात घेण्यात आले. 

संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांना नेण्यात आल्यानंतर राणे समर्थकांनी बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार प्रसाद लाड यांनी एका व्हिडिओचा दाखला देत सांगितले की, नारायण राणे जेवत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. 

पाहा व्हिडिओ 

नारायण राणे यांना ब्लड प्रेशर आणि शुगरचा त्रास आहे. तसेच त्यांचे वय ६५ र आहेत. केंद्रीय मंत्री नाही तर एक ज्येष्ठ नागरीक म्हणून त्यांना सन्मान द्यायला हवा होता. एका ज्येष्ठ मंत्र्यांचा क्लिप आता व्हायरल होते आहे. कोणत्याही परिस्थिती राणेंना अटक करा, अशा सूचना पोलिसांना दिल्याचा आरोपही लाड यांनी केला. 

तसेच नारायण राणे यांच्या विरोधात कोणता गुन्हा दाखल करायचा याची कल्पना पोलिसांना नाही. एसपी हे दरवाजा लावून बसले आहेत.  नाशिकचे अधिकारी अजून संगमेश्वरमध्ये पोहचले नाही आहेत, असेही लाड यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी