Amboli Ghat Rain: आंबोली घाटात ढगफुटी सदृश्य पाऊस, घाटातील धबधब्याचा VIDEO

सिंधुदुर्ग
Updated Aug 05, 2022 | 14:23 IST

Amboli Ghat rain video: कोकणात जोरदार पाऊस पडत आहे. त्याच दरम्यान आंबोली घाटातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

थोडं पण कामाचं
  • आंबोली घाटात ढगफुटीसदृश्य पाऊस 
  • पाऊस कमी होईपर्यंत आंबोली घाटातील वाहतूक रोखली
  • बांदा ग्रामपंचायत आणि प्रशासन अलर्ट

Rain in Sindhudurg: कोकणात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्गातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंबोली घाट परिसरात तर ढगफुटीसदृश्य पाऊस पडला आहे. आंबोली घाटात झालेल्या या पावसामुळे धबधब्यांचे पाणी पूर्ण रस्त्यावर आले. आंबोली घाटातील एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओ पाहून तुम्हाला परिस्थितीचा अंदाज येईल. (Maharashtra Rain updates cloudburst like rainfall in amboli ghat watch video)

आंबोली येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्यामुळे छोट्या धबधब्याचे पाणी थेट रस्त्यावर कोसळत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सावंतवाडी - आंबोली मार्गावरील वाहतूक थांबवली आहे. तर दुसरीकडे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात तेरेखोल नदीत आल्यामुळे माडखोल विलवडे सह बांदा येथे पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहावे असे आवाहन बांदा गावचे सरपंच अक्रम खान आणि माडखोल गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊ कोळमेकर यांनी केले आहे.

तर पाऊस कमी होईपर्यंत आंबोली घाटातील वाहतूक रोखण्यात आली आहे असे तेथील आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले. आंबोली परिसरात गेल्या चार तासापासून ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे संततधार कोसळत असल्यामुळे घाटातील छोट्या धबधब्याचे पाणी रस्त्यावर कोसळत आहे. याबाबतची माहिती काही वाहनधारकांकडून देण्यात आल्यानंतर आंबोली पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री केली आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर बांदा ग्रामपंचायत व प्रशासन अलर्ट झाले असल्याचे सांगण्यात आले.

अधिक वाचा : Rain in Maharashtra : राज्यात मुसळधार पावसामुळे आतापर्यंत २८ जिल्ह्यांना फटका, ११० जणांचा मृत्यू;  NDRF & SDRF च्या १४ तुकड्या तैनात

पुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा
५ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगरज्ना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.

६ ऑगस्ट 

कोकण - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

मराठवाडा - बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

विदर्भ - बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी