[VIDEO] नांगरणी स्पर्धेदरम्यान उधळली बैलजोडी, थरारक घटना कॅमऱ्यात कैद 

सिंधुदुर्ग
Updated Aug 12, 2019 | 20:03 IST | टाइम्स नाऊ मराठी

रत्नागिरीच्या देवरूख जवळच्या पाटगाव येथे पारंपरिक नांगरणी स्पर्धेवेळी एक बैलजौडी उधळली, या वेळी उपस्थितांपैकी एक जण या अपघातात जखमी झाला.  पाटगावमध्ये भात लावणीपूर्वी चिखलात नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली

bull uncontrolled in ratnagiri
रत्नागिरीच्या देवरूखमध्ये नांगरणी स्पर्धेत एक बैलजोडी उधळली, अपघातात एक जण जखमी 

देवरुख : रत्नागिरीच्या देवरूख जवळच्या पाटगाव येथे पारंपरिक नांगरणी स्पर्धेवेळी एक बैलजौडी उधळली, या वेळी उपस्थितांपैकी एक जण या अपघातात जखमी झाला.  पाटगावमध्ये भात लावणीपूर्वी चिखलात नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत एक बैलजोडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि वेगाने धावणारी ही बैलजोडी बांबूचे बॅरिकेट तोडून आता रिंगणात घुसली.

आयोजकांच्या संरक्षकाने या उधळलेल्या बैलजोडीला थांबविण्याचा प्रयत्न केला, पण अत्यंत जोशात आलेल्या बैलानी त्याला धडक मारली आणि नांगरासह त्यांच्या अंगावरून त्याला व्यक्तीला तुडवत ते पुढे गेले. नांगर आणि अडकलेले बॅरिकेट यामुळे बैलजोडीला पुढे जाणे अवघड होते. परंतु तरीही अनेक जणांना ढुसण्या देत या बैलजोडीने काही काळासाठी या स्पर्धेच्या ठिकणी थैमान घातले होते. अवघ्या काही क्षणात काही कळण्याचा आत हा प्रकार घडला. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...