VIDEO: आयुष्यात माझ्याकडून झालं मोठं पाप, शिवसेना खासदाराला 'या' गोष्टीचा होताय पश्चाताप

सिंधुदुर्ग
Updated Jul 06, 2022 | 18:47 IST

Maharashtra Political news: राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत असून राज्यात सत्तांतरही झालं आहे. त्याच दरम्यान राजकीय नेत्यांच्या विविध प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. 

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra CM Eknath Shinde) यांनी ट्वीटच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला आहे असं ट्विट एकनाथ सिंदे यांनी केलं. यावर बोलताना शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत (Shiv Sena MP Vinayak Raut) म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ट्वीट करायच... स्व:तच्या हाताने ट्वीट करता येत का? हा अभ्यास करावा लागेल.

खासदार विनायक राऊत यांनी पुढे म्हटलं, एकनाथ शिंदे यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली त्याचा पश्चाताप होतो आयुष्यातील मोठं पाप झालंय. मी सांगितलं नसतं तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली नसती असंही राऊत यांनी सांगितले. 

महाराष्ट्रातल्या गावांना ओळखणारा एकमेव नेता म्हणजे उध्दव ठाकरे आहेत. राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं पत्र राहूल शेवाळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलंय. या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठलंय. लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही सांगता आलं असतं त्यांचे दरवाजे उघडे होते असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा : मोठी बातमी! शिवसेनेनंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीला बंडाची कीड लागणार; मोठं खिंडार पडणार, 'या' आमदाराने केला दावा

शिवसेनेचे 39 आमदार शिंदे गटात सामिल झाले, आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 18 पैकी 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत तर 22 माजी आमदार देखील संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार नाही जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा. एवढ्या मोठ्या मनाचा नेता आम्हाला लागला यातच आम्हाला समाधान असल्यास राहू असंही त्यांनी म्हटलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी