मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाही

सिंधुदुर्ग
Updated Jun 12, 2022 | 23:14 IST

Uddhav Thackeray is not eligible for the post of Chief Minister says Narayan Rane : मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाही; असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे म्हणाले.

थोडं पण कामाचं
  • मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाही
  • केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचे वक्तव्य
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, नारायण राणेंची मागणी

Uddhav Thackeray is not eligible for the post of Chief Minister says Narayan Rane : सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे पात्र नाही; असे केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे म्हणाले.  सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात संवाद राखणे, राज्यासाठी काम करणे यापैकी काहीही करताना मुख्यमंत्री दिसत नसल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. राज्यसभेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे आमदार फुटले आहेत त्यामुळे नैतिकतेच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असेही नारायण राणे म्हणाले.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत आमचे सगळे उमेदवार निवडून येतील म्हणणाऱ्या शिवसेनेचा एक उमेदवार हरला. सेनेचे संजय राऊत जेमतेम ४१ मते मिळवून जिंकले. थोडक्यात वाचले. याउलट राज्यात विरोधात असलेल्या भाजपचे सर्वच्या सर्व तीन उमेदवार निवडून आले. भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसूनही हे घडले आणि सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देणारे आमदार आता भाजपच्या पाठिशी आहेत. याचा अर्थ सत्ताधाऱ्यांकडे आमदारांचे पाठबळ नाही. ही बाब लक्षात घेऊन नैतिकतेच्या मुद्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा, असे नारायण राणे म्हणाले.

आमदारांची भाजपवर असलेली निष्ठा आणि प्रामाणिकपणा यामुळे निवडणुकीत भाजपचा विजय झाला. निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे जे नेते वाघाप्रमाणे डरकाळी फोडत होते, ते प्रत्यक्षात शेळीही नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांसाठी जी भाषा वापरली नाही, तशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली. मात्र, निकालानंतर त्यांच्यावर आता नामुष्की ओढवली आहे. असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभणे, हे राज्याचे दुर्दैव असल्याचे नारायण राणे म्हणाले. 

महाविकास आघाडीची जेवढी मते शिवसेनेला मिळायला हवी होती, तेवढीही मते त्यांना मिळाली. शिवसेनेचा मुख्यमंत्री असूनही ही परिस्थिती निर्माण झाली. सरकारचेच आमदार फुटले. सरकारची विश्वासार्हता कुठे आहे? आम्ही विरोधात असूनही एकत्र राहिलो. सत्ताधारी आमदारांची मते फुटली, असे नारायण राणे म्हणाले.

महाराष्ट्रात सत्तेत राहण्यासाठी विधानसभेच्या १४५ आमदारांचा पाठिंबा लागतो. पण राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने सरकार अल्पमतात असल्याचे दिसून आले. ही बाब लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता तुम्ही राजीनामा द्या, असे नारायण राणे म्हणाले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी