पंढरपूर : राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी जादा बसेस सोडण्यची घोषणा केली आहे. पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळातर्फे सुमारे ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त विठू नामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे.
अधिक वाचा : जलआक्रोश मोर्चावेळी आला पाऊस अन देवेंद्र फडणवीस म्हणाले
यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतानाच लाखो भाविक प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्यासाठी एसटीचे चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी तसेच अधिकारी वर्गही अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. त्याचबरोबर, यात्रेसाठी मुंबईसह, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या सहा प्रदेशांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. ६ जुलै ते १४ जुलै, २०२२ दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहोळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
अधिक वाचा : बिश्नोई गँगला मुंबईत सुरू करायचा होता खंडणीचा धंदा
औरंगाबाद प्रदेशातून १२००, मुंबई ५००, नागपूर १००, पुणे १२००, नाशिक १००० तर अमरावती येथून ७०० अशा प्रकारे यात्रेसाठी विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती परब यांनी दिली आहे. दरम्यान, अनिल परब यांनी पंढरपूर यात्रेसाठी सुमारे ४७०० गाड्या सोडण्यात येणार असल्याचे जाहिर केले आहे.
अधिक वाचा : खासदार गौतम गंभीरवर स्वरा भास्करनं वाढवला 'स्वर'
भिमा यात्रा देगाव -औरंगाबाद, नागपूर व अमरावती प्रदेश
चंद्रभागा बसस्थानक -मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार
पांडुरंग बसस्थानक – सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग
विठ्ठल कारखाना – नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर