Solapur Barshi Fire : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अग्नितांडव!, फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन ६ मृत्यू, २५ जण गंभीर

Barshi Fire: सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पागांरी गावाजवळील फटाका कारखान्यामध्ये स्फोट झाली. या दुर्घटनेमुळे लागलेल्या आगीत ६ ते ७ जण होरपळले असल्याची माहिती आहे.

6 tragic death due to blast in Barshi firecracker factory
Solapur Barshi Fire : नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी अग्नितांडव!, फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट होऊन ६ मृत्यू, २५ जण गंभीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बार्शीत फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट
  • ६ कामगारांचा भाजून मृत्यू, १५ जण जखमी
  • कारखान्यात 40 कामगार असल्याची माहिती

सोलापूर : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नाशिक येथील इगतपूरी येथील स्फोटानंतर दुपारी सोलापूर जिल्ह्यात भयानक घटना घडली आहे. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळील फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा फटाका फॅक्टरीमध्ये जवळपास ४० कर्मचारी काम करत होते. त्यापैकी ६-७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर २५ जण गंभीर झाल्याची प्राथमिक माहिती आहे. (6 tragic death due to blast in Barshi firecracker factory)

अधिक वाचा :  Fire Breaks Out at Jindal Company Nashik | जिंदाल कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट, नेमकं काय झालं?, पहा Video

पांगरी येथील फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचे काम सुरू असताना स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही आग विझविण्याचे काम प्रशासनाकडून केले जात आहेत. तर जखमींना नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

अधिक वाचा :  Railway Megablock : रेल्वे प्रवासाला निघण्याआधी हे वाचा, आज नव्या वर्षातला पहिला मेगाब्लॉक

या स्फोटाची भीषणता इतकी होते की, कारखान्याच्या परिसरातील पाच ते दहा किलोमीटर अंतरापर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू आल्याचे सांगण्यात आले. या दुर्घटनेमध्ये मयताची संख्या वाढण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. कारखान्यातून आगीचे लोट मोठ्या प्रमाणात येत असल्याने बचावकार्यास अडचणी निर्माण येत आहेत. दुपारी ४ पर्यंत ६ मृतदेह कारखान्यातून बाहेर काढण्यात आले होते तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी