इज्तेमाहून परतत असताना झाला भीषण अपघात , तिघांचा मृत्यू , पाचजण जखमी

accident three killed and five people injured in mangalavedha : सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून , या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले. मंगळवेढा - सोलापूर मार्गावर बेगमपूरजवळ  हा अपघात झाला. 

accident three killed and five people injured in mangalavedha
इज्तेमाहून परतत असताना झाला भीषण अपघात , तिघांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • औरंगाबाद येथून उमदीकडे निघाले असताना बेगमपूर जवळ हा भीषण अपघात झाला
  • सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते
  • पहाटे साडेपाचच्या सुमारास दामाजी कारखान्याजवळ हा भीषण अपघात झाला

सोलापूर :  सोलापूर जिल्ह्यात एक भीषण अपघात झाला असून , या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मंगळवेढ्यात हा अपघात झाला आहे. टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.  मंगळवेढा - सोलापूर मार्गावर बेगमपूरजवळ  हा अपघात झाला. 

पहाटे साडेपाचच्या सुमारास दामाजी कारखान्याजवळ हा भीषण अपघात झाला

आज पहाटे साडेपाचच्या सुमारास दामाजी कारखान्याजवळ हा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातास जबाबदार असणाऱ्या टेम्पो चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  मंगळवेढा - सोलापूर मार्गावर कार आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाल्याने दोघांचा  जागीच मृत्यू झाला आहे.  तर एकाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात अजून एक गंभीर जखमी असून इतर तीन किरकोळ जखमी झाले आहेत.

सहा जण इस्तमासाठी औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते

सर्व अपघात झालेल्या व्यक्ती हे उमदी ,  तालुका जत येथील असून उमदी गावातील सहा जण इज्तमासाठी (Ijtama) (धार्मिक मेळावा) औरंगाबाद येथे तीन दिवसापूर्वी गेले होते. हा कार्यक्रम संपवून रात्री उमदी गावाकडे परत असताना हा अपघात झाला. दरम्यान, औरंगाबाद येथून उमदीकडे निघाले असताना बेगमपूर जवळ हा भीषण अपघात झाला. टेम्पोच्या धडकेने कार मधील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. स्थानिक ग्रामस्थांनी जखमींना गाडीतून बाहेर काढून उपचारासाठी सोलापुरात पाठवले.

अशी आहेत अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे

 या अपघातामध्ये जैनुद्दिन काशीम यादगिरे वय ४०, (रा. उमदी) आणि मौलाना साजिद खान वय ४५ (भिवंडी, मुंबई) सध्या रा. उमदी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर प्रवीण हिरेमठ यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे .या भीषण अपघात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी