New Rule For Vitthal Mandir On Omicron Crisis : साईबाबानंतर आता विठुरायाचे नवीन नियम, कोणत्या वेळात होणार विठू माऊलीचे दर्शन

सोलापूर
भरत जाधव
Updated Dec 26, 2021 | 16:07 IST

New Rule for Pandharpur Vitthal Mandir  : ओमायक्रॉन (Omicron ) आणि कोरोनाबाधितांची (Corona) संख्या वाढू लागल्याने राज्यात जमावबंदी (Curfew) व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढू लागत असल्यानं राज्यातील मुख्य मंदिरात काही निर्बंध आखली जात आहेत.

After Sai Baba, now Vitthal Mandir darshan will be in the rules
पंढरपुरातील विठुुराया रात्री 9 नंतर नाही देणार दर्शन   |  फोटो सौजन्य: YouTube
थोडं पण कामाचं
  • पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी
  • विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर प्रशासनाने जमावबंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले.

New Rule for Pandharpur Vitthal Mandir  :  सोलापूर : ओमायक्रॉन (Omicron ) आणि कोरोनाबाधितांची (Corona) संख्या वाढू लागल्याने राज्यात जमावबंदी (Curfew) व इतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना आणि ओमायक्रॉनचं संकट वाढू लागत असल्यानं राज्यातील मुख्य मंदिरात काही निर्बंध आखली जात आहेत. शिर्डीतील (Shirdi) साई संस्थानानंतर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर प्रशासनानेही दर्शनाच्या वेळेवर बंधने आणली आहेत. या नवीन वेळेनुसार जगाचा विठुराया आता रात्री 9 वाजेनंतर  भाविकांन दर्शन देणार नाही. रात्री 9 वाजेनंतर मंदिर बंद केले जाणार असल्याचा निर्णय मंदिर प्रशासनाच्या बैठकीत घेण्यात आला. 

राज्य सरकारने घेतलेल्या जमावबंदीच्या निर्णयाच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पंढरपूरमध्ये नाताळाच्या सुट्टीमुळे भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीही गर्दी होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ लक्षात घेता मंदिर प्रशासनाने जमावबंदीच्या अनुषंगाने काही निर्णय घेतले आहेत. य नियमांनुसार, भाविकांसाठी रात्री 9 वाजता मंदीर बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी रात्री 9 वाजण्याच्या आधीच मंदिरात प्रवेश करावा लागणार आहे. दरम्यान, सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यात रात्री 9 नंतर जमावबंदी आदेश दिल्याने आजपासून विठ्ठल मंदिर रात्री नऊ वाजता भाविकांसाठी बंद राहणार आहे. 

शिर्डीच्या मंदिरातही असणार निर्बंध 

साई बाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत यांनी ही माहिती दिली की,  साई मंदिर भाविकांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे रात्री 10 वाजत होणारी आरती पहाटे 4 वाजता होणारी काकड आरती फक्त पुजार्‍यांच्या उपस्थितीत होईल. रात्री 9 वाजल्यानंतर मंदिर बंद झाल्यानंतर मंदिराचे प्रसादालयही बंद होणार आहे. कोरोनाकाळात सर्व भक्तांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन बनायत यांनी केले आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी