Solapur News: कंबरे इतक्या पाण्यातून नेण्यात आली महिलेची अंत्ययात्रा, धक्कादायक व्हिडिओ

After the water in the river receded, the body was cremated : मेहताबबी यांच्या निधनानंतर ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली होती. परंतु हरणा नदी पार कडून मुस्लीम स्मशानभूमि कडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मृतदेह घेवून जायचा कसा असा प्रश्न नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना पडला. नदीतून वाहत असलेले पाणी कमी होऊ देण्यापलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता.

After the water in the river receded, the body was cremated
कंबरे एवढ्या पाण्यातून वाट काढत असा करण्यात आला अंत्यसंस्कार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत मृतदेहाला नदीच्या पलीकडे असणार्‍या मुस्लिम स्मशानभूमीत नेण्यात आले
  • पाण्यातून जाता येत नसल्याने सकाळपासून घरातच होता महिलेचा मृतदेह
  • एक महिन्यापूर्वी याच नदीपात्रातून मुस्ती गावातील तरुण गेला होता वाहून

सोलापूर : कंबरे एवढ्या पाण्यातून आपला जीव धोक्यात घालून तारेवरची कसरत करत मृतदेहाला नदीच्या पलिकडे असणार्‍या मुस्लिम स्मशानभूमीत नेण्यात आली असल्याची घटना सोलापूर जिल्ह्यात घडली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने मृत्यू पावलेल्या महिलेच्या नातेवाईकांनी महिलेचं मंगळवारी सकाळी निधन झाले असताना देखील महिलेचा मृतदेह तसाच घरी ठेवला आणि रात्रीच्या वेळेला महिलेचा मृतदेह अंत्यसंस्काराला घेऊन जाण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती या गावात सदर घटना घडली आहे.

अधिक वाचा : पुणे-नाशिक महामार्गावर पाणीच पाणी,चंदनापुरी घाटात दरड कोसळली

पाण्यातून जाता येत नसल्याने सकाळपासून घरातच होता महिलेचा मृतदेह

मुस्लिम समाजातील मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव मेहताबबी मकांनदार असं होत. मेहताबबी यांचे वय 85 वर्षे इतके असून त्यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले होते. मेहताबबी यांच्या निधनानंतर ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली होती. परंतु हरणा नदी पार कडून मुस्लीम स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने मृतदेह घेवून जायचा कसा असा प्रश्न नातेवाईकांना आणि ग्रामस्थांना पडला. नदीतून वाहत असलेले पाणी कमी होऊ देण्यापलीकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. शेवटी ग्रामस्थांनी नदीतील पाणी कमी झाल्यावर नदीपलीकडे जाऊ असा निर्णय घेतला. काल सायंकाळपर्यंत ग्रामस्थांना नदीतील पाणी कमी होण्याची वाट पाहावी लागली. सकाळपासून मृतदेह घरातच होता. अखेर सायंकाळी धार्मिक रीतीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.

अधिक वाचा : Apple iPhone 14: Apple च्या पेठाऱ्यातून आज काय येणार समोर?

एक महिन्यापूर्वी याच नदीपात्रातून मुस्ती गावातील तरुण गेला होता वाहून

मिळालेल्या माहितीनुसार, याच मुस्ती गावातील तरुण एक महिन्यापूर्वी नदीपात्रातून वाहून गेला होता. वाहून गेलेल्या तरुणाला शोधायला किमान दोन दिवस लागले होते. दोन दिवसानंतर त्याचा मृतदेह सापडला होता. या घटनेनंतर गावातील नागरिक हे आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. आक्रमक गावकऱ्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला होता. त्यांनतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून आश्वासन दिले होते.

अधिक वाचा : बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला बॅन भाजपने फाडला 

ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून नदी पार करत आहेत

दरम्यान, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनानंतर आता देखील या नदीवर पूल बांधण्यात आला नाही. गावकऱ्यानी सतत केलेल्या मागणीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सोलापुरातील संपर्क प्रमुख यांनी देखील गावात येऊन ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. पण आजतागायत काहीही उपाययोजना करण्यात आली नाही. ग्रामस्थ हे आपला जीव धोक्यात घालून नदीपार करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी