पारंपरिक दहीदंडीला परवानगी द्या, नाही तर आंदोलन करू - आशिष शेलार  

दहीदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

Allow traditional dahi handi otherwise let's agitate say Ashish Shelar
पारंपरिक दहीदंडीला परवानगी द्या, नाही तर आंदोलन करू  
थोडं पण कामाचं
  • काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली
  • लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी.
  • कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत.

सोलापूर :  काही गणेशोत्सव मंडळांनी कोरोना काळात ज्या पद्धतीने कोरोनाचे नियम पाळून उत्सवाची परंपरा कायम ठेवली त्याच पद्धतीने दहिदंडी उत्सवाची परंपरा अखंड रहावी म्हणून पारंपरिक पद्धतीने दहिदंडी साजरी करण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी, असे भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

लसीचे दोन डोस ज्यांनी घेतले आहेत, अशा गोविंदांना कमी उंचीच्या दहिदंडीला शासनाने परवानगी द्यावी. कोरोनाची परिस्थितीची कल्पना सर्वांना असून त्याबद्दल खबरदारी व काळजी घेण्यास जी उत्सव मंडळे तयार आहेत. त्यांना गर्दी न करता आप-आपल्याला विभागात पारंपरिक पध्दतीने कमी उंचीच्या दहिदंडीला परवानगी शासनाने द्यावी. उत्सवावर पुर्णपणे बंदी असू नये. उत्सवांची परंपरा कायम राहिल अशी भूमिका शासनाने घ्यावी, असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे. आज याबाबत बैठक व्हावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली होती. मात्र सोलापूर दौऱ्याच्या प्रवासात असल्याने त्या़ना बैठकीत सहभागी होता आले नाही.

मविआ सरकारच्या काळात लोक असुरक्षित

चंद्रपूर इथं झालेल्या सामूहिक मारहाणीबद्दलही आशिष शेलार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीचा काळामध्ये लोकांचे जीव असुरक्षित असून सुरक्षा फक्त नेत्यांच्या मुलांची वाढली आहे. महिलावर, बालकांवर अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. पोलिसांवर सरकारचा वचक नाहिए. पोलिसांच्या आपापसातील गटबाजीमुळे ते आतून पोखरून गेले आहेत, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सरकारने गांभीर्याने घेण्याची हात जोडून विनंती असं ते यावेळी बोलले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी