जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड, माजी आमदाराला अटक , तर एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त

arrested including former mla ravikant patil : जुगार प्रकरणात कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील (EX MLA Ravikant Patil) यांच्यासह २९ जणांना अटक करण्यात आली

arrested including former mla ravikant patil
जुगार अड्ड्यावर पोलिसांनी टाकली धाड, माजी आमदाराला अटक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जुगार खेळण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी बहुतांश लोक हे कर्नाटकातील
  • कर्नाटकातून देखील अनेक कार्यकर्ते हे सोलापुरात दाखल
  • एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सोलापूर : जुगार प्रकरणात कर्नाटकातील इंडीचे माजी आमदार रविकांत पाटील (EX MLA Ravikant Patil) यांच्यासह २९ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेतर्फे हॉटेलवर धाड टाकली असता या ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्याचे आढळून आले. दरम्यान, सदर प्रकरणानंतर सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे. जुगार अड्डा स्वतः माजी आमदार रविकांत पाटील चालवत असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. धाड टाकल्याच्या वेळी माजी आमदार रविकांत पाटील हे स्वतः हॉटेलच्या बाहेर कार्यकर्त्यासह बसलेले होते. पोलिसांना खबऱ्यामार्फत सोलापुरातील होटगी रोडवरील क्लब ९ येथे जुगार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला प्राप्त झाली होती. यानुसार त्यांनी ही कारवाई केली असता सुरुवातीला पोलिसांनी चौकशी केली असता सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली होती. मात्र हॉटेलमध्ये पोलीस गेल्यानंतर जवळपास १९ जण हे जुगार खेळताना आढळून आले.

एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

दरम्यान, सर्व २९ आरोपींना रात्री उशिरापर्यंत विजापूर नाका पोलीस ठाण्यात बसविण्यात आले होते. रात्री उशीरा सर्व आरोपींची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. त्यांच्याकडून रोख २ लाख २४ हजार ५४० रुपये, ४ लाख १९ हजारांचे मोबाईल, १३ हजारांचे जुगार साहित्य असे एकूण ६ लाख ५७ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माजी आमदार रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातील त्यांच्या समर्थकांनी विजापूर नाका पोलीस ठण्यासमोर मोठी गर्दी केली होती. 

जुगार खेळण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी बहुतांश लोक हे कर्नाटकातील

पोलिसांची धाड पडल्याचे लक्षात येतात अड्यावरून पळून जाण्यात काही जण यशस्वी देखील झाले. त्याचबरोबर जुगार खेळण्यासाठी आलेल्या या लोकांपैकी बहुतांश लोक हे कर्नाटकातील असल्याचं समोर आलं आहे. मोठ्या आलिशान गाड्यांमधून हे लोक सोलापुरात जुगार खेळण्यासाठी येत होते.

नेमकं कोण आहेत रविकांत पाटील?

रविकांत पाटील यांनी अपक्ष राहून या निवडणुका लढवल्या होत्या. रविकांत पाटील हे कायम कोणत्या ना कोणत्या विषयावरून नेहमीच चर्चेत राहतात.  रविकांत पाटील हे कर्नाटकातील इंडीचे आमदार राहिले आहेत. १९९४, १९९९ , २००४  अशा तीन टर्म सलग निवडून आले होते. 

कर्नाटकातून देखील अनेक कार्यकर्ते हे सोलापुरात दाखल

काल रविकांत पाटील यांना अटक झाल्याचे कळताच कर्नाटकातून देखील अनेक कार्यकर्ते हे सोलापुरात दाखल झाले होते. त्यांच्या समर्थकांनी पोलीस स्थानकाबाहेर मोठी गर्दी केली होती. त्यामुळे सोलापूरच्या विजापूर नाका पोलीस ठण्यासमोरील तणावपूर्ण बनले होते. दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना पोलीस ठाण्यात बाहेर फरशीवरच बसवले होते. तर माजी आमदार रविकांत पाटील यांना मात्र चौकशी कक्षात बसविण्यात आले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी