SOLAPUR | औरंगाबादची राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीने दिला इशारा

मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज ठाकरे येत्या 1 तारखेला औरंगाबादला सभा घेणार आहेत. 

Bhim Army warns to disrupt Raj Thackeray's rally in Aurangabad
राज ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा भीम आर्मीने दिला इशारा 
थोडं पण कामाचं
  •  मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे.
  • राज ठाकरे येत्या 1 तारखेला औरंगाबादला सभा घेणार आहेत. 
  • ज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिलेला आहे.

सोलापूर :  मनसेप्रमुख राज ठाकरेंनी भोंग्यावर घेतलेल्या भूमिकेमुळे सर्वत्र वातावरण तापलं आहे. राज ठाकरे येत्या 1 तारखेला औरंगाबादला सभा घेणार आहेत. 

मात्र, राज ठाकरेंची औरंगाबादची सभा उधळून लावण्याचा इशारा भीम आर्मीने दिलेला आहे. राज ठाकरेंच्या सभेसाठी पोलीस प्रशासनाने 16 अटी घालून दिलेल्या आहेत, त्याच उल्लंघन ठाकरेंकडून सभेत झालं तर या सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंच्या घोषणा देऊन सभा बंद पाडू असा इशारा भीम आर्मीने दिलाय. 

संपूर्ण महाराष्ट्रातून भीम आर्मीचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेला जाणार असल्याच भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी