एमआयएमला मोठा झटका, आता उरणार फक्त दोनच नगरसेवक

Big blow to MIM, now only two corporators will be left : एमआयएमचे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत ६ नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे.

Big blow to MIM, now only two corporators will be left
एमआयएमला मोठा झटका, आता उरणार फक्त दोनच नगरसेवक   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमआयएमचे नेते तौफिक शेख यानी एमआयएमला सोडचिट्ठी दिली
  • जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार
  • एमआयएममध्ये फक्त दोनच नगरसेवक उरणार

सोलापूर : कॉंग्रेसच्या नेत्या तथा आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिस्पर्धी मानले जाणारे एमआयएमचे नेते तौफिक शेख यानी एमआयएमला सोडचिट्ठी दिली आहे. तोफिक शेख यांनी आता राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहे. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडवरच एमआयएमला मोठा झटका बसला आहे. सोलापुरातील एमआयएमचे सहा नगरसेवक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (ncp) प्रवेश करणार आहेत. तोफिक शेख यांच्यासह सहा नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार असल्याने सोलापूर महापालिकेत वाढत असलेला एमआयएमचा प्रभाव कमी होणार हे मात्र नक्की. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत नगरसेवकांचा हा प्रवेश सोहळा होणार आहे. विशेष म्हणजे तौफिक शेख हे काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांचे प्रतिस्पर्धक मानले जातात. त्यामुळे शेख यांना पक्षात प्रवेश देऊन राष्ट्रवादीने एमआयएमला खिंडार पाडतानाच काँग्रेसलाही शह दिल्याचं बोललं जात आहे.

अधिक वाचा : मुंबईत महिला वकिलाचा पाठलाग करणाऱ्या नीरज मियांला अटक

जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार

एमआयएमचे नेते आणि नगरसेवक तौफिक शेख यांच्यासोबत ६ नगरसेवक आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जयंत पाटलांच्या उपस्थितीत एमआयएमचे ६ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. नगरसेवकांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे सोलापुरात एमआयएमला मोठा धक्का बसला आहे. तर, हा धक्का प्रणिती शिंदे यांना देखील असल्याचे बोलले जात आहे. कारण, तोफिक शेख यांचा सोलापुरात चांगला जनसंपर्क आहे. तोफिक शेख यांना भविष्यात राष्ट्रवादीचे चांगले बळ मिळाले तर प्रणिती शिंदे यांची मोठी अडचण होऊ शकते. शेख यांच्यासह शेकडो समर्थक आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. तौफिक शेख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे आमदार प्रणिती शिंदे यांना कडवे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : SpiceJet च्या विमानात पडायला लागले 'Tip Tip' पावसाचे पाणी

एमआयएममध्ये फक्त दोनच नगरसेवक उरणार

गेल्या महापालिका निवडणुकीत एमआयएम पक्षाला मोठ यश मिळाले होते. एमआयएमचे तब्बल ८ नगरसेवक निवडणुकीत निवडून आले होते. या आठ नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे एमआयएममध्ये फक्त दोनच नगरसेवक उरणार आहेत. त्यामुळे एमआयएमसमोर मोठी डोकेदुखी निर्माण होणार आहे. यातच महत्वाचा नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागल्याने एमआयएमला निवडणुकीच्या तोंडावर मोठा झटका मनाला जात आहे.

अधिक वाचा : मधुमेहाचे रुग्ण आहात का? अशा प्रकारे करा त्रिफळाचे सेवन 

महापालिकेत अशी आहे एकूण पक्षाच्या संख्या?
MIM – ०८
माकप – ०१
अपक्ष/इतर – ०४
रिक्त – ०१
शिवसेना २१
काँग्रेस १४
राष्ट्रवादी ०४

भाजप – ४९
एकूण = १०२

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी