deputy mayor tadipar भाजपच्या विद्यमान उपमहापौरांनावरचं तडीपारीची कारवाई, एवढ्या जिल्ह्यातून करण्यात आलं तडीपार

bjp deputy mayor rajesh kale deport tadipar : सामाजिक काम करत असताना झालेल्या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असल्याचं काळे यांनी म्हटलं आहे

bjp deputy mayor rajesh kale deport tadipar
भाजपच्या विद्यमान उपमहापौरांनावरचं तडीपारीची कारवाई  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • राजेश काळे हे सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले भाजपचे नगरसेवक
  • सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांना तडीपार करण्यात आलं आहे
  • माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असून यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागणार – राजेश काळे

deputy mayor tadipar सोलापूर : पुढील दोन वर्षांसाठी सोलापूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यातून तसेच इंदापूर तालुक्यातून सोलापूरचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे (Solapur Deputy Mayor Rajesh Kale) यांना तडीपार करण्यात आलं आहे. तडीपारीच्या आदेशाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे.  ते स्वतः सोलापूर सोडून निघाले आहेत, अशीही माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. तडीपारीचे आदेश स्वतः राजेश काळे यांच्याकडून प्राप्त झाल्याच्या माहितीस दुजोरा देण्यात आला आहे. तर, निवडणुका तोंडावर असताना राजकीय द्वेषापोटी कारवाई झाल्याची टीका काळे यांनी केली आहे. काळे हे भाजपचे नगरसेवक तथा सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर आहेत. काळे यांच्यावर शिवीगाळ, फसवणूक अशा विविध पद्धतीचे आरोप आहेत.

राजेश काळे हे सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले भाजपचे नगरसेवक

सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडुकर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. उपमहापौर राजेश काळे हे सोलापूर महानगरपालिकेत सत्ताधारी असलेले भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर सोलापूर पोलीस आयुक्तालयासह अन्य काही पोलिस स्थानकात देखील गुन्हे दाखल आहेत. काळे यांना सोलापूर, उस्मानाबाद तसेच पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातून या दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. काळे यांच्यासोबत महानगरपालिकेचे विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचा मुलगा चेतन गायकवाड यास देखील पोलिसांनी तडीपार घोषित केले आहे.

काळे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे

शासकीय अधिकारी आणि सामान्य नागरीकांना अॅट्रॉसिटी दाखल करण्याची धमकी देणे, सामान्य नागरीक व व्यावसायीकांना धमकावून पैशाची मागणी करणे,  राजकीय पदाचा गैरवापर करुन नियमबाहय पध्दतीने काम करण्यासाठी दबाव तंत्राचा वापर करणे, शासकीय कर्मचारी काम करीत असतानासुध्दा धाकदपटशा दाखवण्याच्या उद्देशाने त्याने सरकारी काम करु नये याकरीता अंगावर जाणे इत्यादी गंभीर स्वरुपाचे गुन्हे राजेश काळे यांच्याविरोधात दाखल आहेत. त्यामुळे ते सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. 

माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असून यासंदर्भात मी न्यायालयात दाद मागणार – राजेश काळे

सामाजिक काम करत असताना झालेल्या आंदोलनामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहेत. त्यामुळे माझ्यावर झालेली ही कारवाई चुकीची असल्याचं काळे यांनी म्हटलं आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत. त्यामुळे निवडणुकापूर्वी राजकीय द्वेषापोटी आपल्यावर ती ही कारवाई झाल्याचा आरोप उपमहापौर राजेश काळे यांनी केला. सर्वपक्षीय नेत्यांनी माझ्या विरोधात कटकारस्थान रचले आहे. माझ्यावर खून, दरोडा अशा प्रकारचे कोणतेही गंभीर गुन्हे दाखल नसून मी माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईवर न्यायालयात दाद मागणार आहे. अशी प्रतिक्रिया उपमहापौर राजेश काळे यांनी दिली.  


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी