कंटेनरच्या धडकेत कॉलेज तरुणी ठार, कंटेनर चालकाला अटक

College girl killed in container collision, container driver arrested : सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या बाळे येथे अपघात झाला. कॉलेज तरुणीच्या दुचाकीला कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी रस्त्यावर पडली आणि कॉलेज तरुणीचा मृत्यू झाला. 

College girl killed in container collision, container driver arrested
कंटेनरच्या धडकेत कॉलेज तरुणी ठार 
थोडं पण कामाचं
  • कंटेनरच्या धडकेत कॉलेज तरुणी ठार
  • महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या बाळे येथे झला अपघात
  • कंटेनर चालकाला अटक

College girl killed in container collision, container driver arrested : सोलापूर : महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातल्या बाळे येथे अपघात झाला. कॉलेज तरुणीच्या दुचाकीला कंटेनरने मागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी रस्त्यावर पडली आणि कॉलेज तरुणीचा मृत्यू झाला. 

अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव वैष्णवी सरवदे असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. ती संगमेश्वर कॉलेजच्या बी. एससी शाखेत तिसऱ्या वर्षाला शिकत होती.

कॉलेज सुटल्यावर मैत्रीणींशी थोडा वेळ गप्पा मारून नंतर वैष्णवी सरवदे दुचाकीवरून घराच्या दिशेने निघाली. यावेळी अपघात झाला. अपघातात तरुणीचा मृत्यू झाला. पोलिसांनी कंटेनर चालक अजरोद्दीन शेख याला अटक केली. कंटेनर चालकाविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी