प्रणिती शिंदेंची सरकार जोरदार टीका, म्हणाल्या तुमचं ओके आहे पण.......

Praniti Shinde strongly criticized the government : त्यांच्यासाठी काय झाडी, काय डोंगार..काय हॉटेल असं सगळंच ओकेमधी झालं आहे. परंतु इकडं महाराष्ट्र मात्र नॉट ओके झाला आहे. असं आमदार शिंदे म्हणाल्या. “ राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका होताच सत्ताधारी शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले. तेथे त्यांना मौज करताना झाडी, डोंगर आणि हॉटेलची कुतुहल वाटले. असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

Praniti Shinde strongly criticized the government
प्रणिती शिंदेंची सरकार जोरदार टीका, म्हणाल्या तुमचं ओके पण..  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • त्यांचं समदं ओकेमधी असलं तरी महाराष्ट्र ओकेमधी नाही.
  • नव्या सरकारला अद्याप मंत्रीमंडळ बनविताना आले नाही
  • पुरणपोळी कशी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची, दहा वेळा विचार करण्याची वेळ  

सोलापूर ; काही दिवसांपूर्वी शिंदे गटात सामील झालेले आमदार शहाजी बापू पाटील यांचा एक डायलॉग मोठ्या चर्चेत आलं होत. ते म्हणजे झाडी..काय डोंगार, काय हॉटेल. शहाजी बापू पाटील यांचा हा डायलॉग प्रत्येकाच्या ओठावर होता. मात्र, आता विरोधक आता टीका करण्यासाठी हाच डायलॉग वापरत असल्याचं पहायला मिळत आहेत. कॉंग्रेसच्या नेत्या प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारवर टीका करण्यासाठी हाच डायलॉग वापरला आहे. त्या, म्हणाल्या की, “राज्यात राजकीय नाट्य घडून सत्तांतर होताना काय झाडी..काय डोंगार, काय हॉटेल…अशी चंगळ शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी गुवाहाटीत केली. परंतु त्यांचं समदं ओकेमधी असलं तरी महाराष्ट्र ओकेमधी नाही.” असं म्हणत आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे. (congress mla Praniti Shinde criticized the state government)

अधिक वाचा : Asia Cup 2022: या दिवशी रंगणार आशिया कपमध्ये भारत-पाक सामना

नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे?

त्यांच्यासाठी काय झाडी, काय डोंगार..काय हॉटेल असं सगळंच ओकेमधी झालं आहे. परंतु इकडं महाराष्ट्र मात्र नॉट ओके झाला आहे. असं आमदार शिंदे म्हणाल्या. “ राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुका होताच सत्ताधारी शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन सर्व बंडखोर आमदार गुवाहाटीत गेले. तेथे त्यांना मौज करताना झाडी, डोंगर आणि हॉटेलची कुतुहल वाटले. असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं.

अधिक वाचा ; या दिग्गज क्रिकेटरने 'गे' असल्याचा केला धक्कादायक खुलासा

नव्या सरकारला अद्याप मंत्रीमंडळ बनविताना आले नाही

दरम्यान, प्रणिती शिंदे यांनी शिंदे सरकारवर टीका करत म्हटलं आहे की, एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोनच मंत्र्यांवर सरकारचा कारभार चालत आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी भाजपाला सोबत घेऊन सरकार स्थापन करून महिना उलटला असला तरी या नव्या सरकारला अद्याप मंत्रीमंडळ बनविताना आले नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. दरम्यान, सोलापूर येथे बोलताना प्रणिती शिंदे यांनी सरकावर काही प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले आहेत.

अधिक वाचा : "तानाजी सावंताची काय लायकी", 'या' नेत्याने केला पलटवार

पुरणपोळी कशी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची, दहा वेळा विचार करण्याची वेळ  

वाढत्या महागाईसंदर्भात देखील प्रणिती शिंदे यांनी सरकारवर टीका केली आहे. गहू, तेल, गूळ, डाळी असे सर्व प्रचंड महागले आहेत. तेव्हा पुरणपोळी कशी बनवून कुटुंबीयांना खाऊ घालायची, याचा दहावेळा विचार करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे. असं शिंदे म्हणाल्या. त्याचबरोबर,  “एकीकडे केंद्र सरकारच्या सपशेल अपयशी आणि चुकीच्या धोरणांमुळे दररोजच महागाईचा भडका उडत आहे. त्याचा फटका घराचा गाडा ओढणा-या गृहिणींना बसत आहे. नागपंचमीसारख्या सणासुदीला पुरणपोळी बनविण्याचीही पंचाईत पडली असल्याचंही शिंदे यांनी म्हटलं आहे. म्हणजेच महाराष्ट्रातील सामान्य जनता आज नॉट ओके मध्ये आहे. त्याची काळजी अस्थिर सरकारला कशी राहणार?” असा प्रश्नार्थक टोलाही आमदार प्रणिती शिंदे यांनी लगावला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी