आठ महिन्यापासून चिमुरडी थेट गाईला पिते, काय आहे या व्हायरल फोटो मागची सत्य घटना? नक्की वाचा

cow feeding 2 year girl सईला बालपणापासून गायीच्या कासेला तोंडू लावून दूध पिण्याची सवय आहे. आता ती दोन वर्षांची असली ती ही परिस्थिती कायम आहे.

cow feeding 2 year girl
आठ महिन्यापासून चिमुरडी थेट गाईला पिते  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • चिमुरड्या मुलीचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लागताच गाईने पान्हा सोडला
  • कपात किंवा ग्लास मध्ये दिलेले दूध सई पीत नाही
  • गाईमुळे आता आमच्या घरातील मुलेही हुशार सदृढ बनले

करमाळा : काही दिवसांपासून एक फोटो किंवा व्हिडीओ आपण सोशल मिडियामध्ये पाहिला असेल. फोटोमध्ये एक लहानगी चिमुकली थेट गाईच्या कासेला तोंड लावून दूध पीत असताना दिसत आहे. निश्चितच सर्वांना प्रश्न पडला असेल की हा फोटो नेमका कुठला आहे? दरम्यान , याच उत्तर देखील आम्ही तुम्हाला देणार आहोत. भगवान कृष्ण थेट गाईच्या कासेला तोंड लावून दूध प्यायचे अशी पुराणातील गोष्टी आपण सतत ऐकत असतो. हिंदू धर्मात गायीला गोमाता म्हणतात आणि त्यामुळेच गाय आणि माय हे शब्द पुरातन काळापासून पुढे आले आहेत. भगवान कृष्ण जसे गायीच्या कासेला तोंड लावून दुध पीत होते. अगदी अशाच प्रकारे एक चमत्कारिक गोष्ट करमाळा तालुक्यातील केम या गावात अनुभवायला मिळत आहे. cow feeding 2 year girl

चिमुरड्या मुलीचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लागताच गाईने पान्हा सोडला

दरम्यान, करमाळा तालुक्यातील केम येथे परमेश्वर तळेकर यांनी देशी गाईचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले आहे. याच परमेश्वर तळेकर याची नात आहे, जीच नाव सई आहे. सई आठ महिन्याची असताना, आजोबांच्या प्रमाणे सई हिलाही गाईंचा विशेष लळा लागला होता. एके दिवशी सईला तिच्या आजोबांनी गाईचे दूध पिण्यासाठी कपिला गायीच्या गोठ्यात नेले, आणि सईचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लावले. जसच सईचं तोंड गायीच्या आचळाला लागले तसच गाईने देखील सईला दुध पिण्यासाठी पान्हा सोडला आणि चिमुरडी सई थेट गाईला पिऊ लागली. सई गायीला पीत असताना पाहून आजोबा देखील खुश झाले आणि आता सईचे आजोबा तिला रात्री भूक लागल्यावर गोठ्यात घेवून जातात. आणि कपिला गाय तिच्या जवळ येऊन उभी राहून तिला आपले दूध पिण्यास देते.

कपात किंवा ग्लास मध्ये दिलेले दूध सई पीत नाही

८ महिन्यापासून सईला गायीचे दुध कासेला तोंड लावून प्यायची सवय आहे. त्यामुळे ती, कपात किंवा ग्लास मध्ये दिलेले दूध सई पीत नाही किंवा दुसरेही ती काही खात नाही. सई आता दोन वर्षाची झाली आहे मात्र आजही तिला भूक लागली कि थेट गाईच्या गोठ्यात जाऊन कपिला गाईच्या कासेला तोंड लावून धारोष्ण दूध पिते. कुटुंबासाठी ही थोडी अडचण असली तरी आजोबा परमेश्वर यांच्या मते देशी गाईच्या दूध पिण्याने तिच्यामध्ये अतिशय झपाट्याने सुधारणा दिसत असून सई आता स्पष्ट उच्चारांमध्ये बोलते. 

गाईमुळे आता आमच्या घरातील मुलेही हुशार सदृढ बनले

सईची बुद्धिमत्ता इतर लहान मुलांच्या तुलनेत विशेष दिसत असल्याने या देशी गाईमुळे आता आमच्या घरातील मुलेही हुशार सदृढ बनल्याचे आजोबा परमेश्वर अभिमानाने सांगतात. वयाच्या मानाने सईमध्ये शारीरिक प्रगतीही झपाट्याने होत असून लवकर चालू लागल्याचे आजोबा सांगतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी