काल नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल विरोधात एमआयएमने काढला मोर्चा, आज तब्बल एवढ्या लोकांवर गुन्हा दाखल

Crimes filed against MIM activists in solapur : मुस्लीम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यात संतप्त झालेल्या एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हुल्लडबाजी केली. तसेच शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जात असताना गेटची साखळी तोडत आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मोर्चात त्यामुळे मोर्चाचे आयोजन करणाऱ्या  एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crimes filed against MIM activists in solapur
काल एमआयएमने काढलेल्या मोर्च्यातील कार्यकत्यावर गुन्हे दाखल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • एमआयएमने काल भव्य नुपूर शर्मोमा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढला होता.
  • मोर्चा प्रकरणात आता १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • मोर्चातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हुल्लडबाजी देखील केली

सोलापूर :  प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्याविषयी भारतीय जनता पार्टीच्या नेत्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांनी केलेल्या वक्तव्या विरोधात एमआयएमने काल भव्य मोर्चा काढला होता. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना अटक करावी या मागणीसाठी हा भव्य मोर्चा निघाला होता. पोलिसांनी एमआयएमने काढलेल्या मोर्चाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. एमआयएमच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुस्लीम समाजाच्या मोर्चा प्रकरणात आता १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक संपत्तीचे नुकसान आणि पोलिसांनी दिलेल्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमचे शहराध्यक्ष फारुख शाब्दि यांच्यासह एकूण १० जणविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

अधिक वाचा : गेल्या वर्षी आयटीआर भरला नसल्यास यंदा जास्त टीडीएस कापणार

मोर्चातील कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हुल्लडबाजी देखील केली

दरम्यान, मुस्लीम समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या मोर्च्यात संतप्त झालेल्या एका गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेट येथे हुल्लडबाजी केली. तसेच शिष्टमंडळ जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यासाठी जात असताना गेटची साखळी तोडत आत मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मोर्चात त्यामुळे मोर्चाचे आयोजन करणाऱ्या  एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दि यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारणी सरकारी पक्षातर्फे पोलीस हवालदार अजितसिंह देशमुख यांनी फिर्याद दिली असून, सोलापुरातील सदर बाजार पोलीस ठाण्यात भादवि कलम १४३, १४७, १८८, सार्वजनिक संपत्ती नुकसान  प्रतिबंधक अधिनियमचे कलम ३, महाराष्ट् पोलीस  अधिनियम कलम 135 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अधिक वाचा ; अरूण जेटली स्टेडियमवर आपापसात भिडले फॅन्स, पाहा व्हिडीओ 

प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांना देखील गर्दी नियंत्रण करणे जिकरीचे झाले होते

नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मोर्चेकरांनी केली. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने पोलिसांना देखील गर्दी नियंत्रण करणे जिकरीचे झाले होते. सोलापुरात एमआयएमच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आला.  सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालसमोर हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित जमले होते. तसेच गर्दी काहीशी आक्रमक होत जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न देखील मोर्च्यात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी केला होता.

अधिक वाचा : श्रीलंकेची आर्थिक स्थिती खराब तरीदेखील रंगणार LPL चा थरार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी