सोलापुरातील गणपती बाप्पाला रडताना पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात रांग; नारळ, फळे अर्पण करण्यासाठी नागरिकांची पळापळ

Water started coming from Ganapati's eyes, devotees crowded for darshan : मिळालेल्या माहितीनुसार, सदर अफवा बघता बघता अनेक गावात पसरली. सदर माहिती मिळताच भाविकांचा ओघ दर्शनासाठी मंदिराकडे येऊ लागला. एवढच नव्हे तर भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले आहे.

Devotees line up at temple to see Ganpati Bappa crying in Solapur
गणपती बाप्पाला रडताना पाहण्यासाठी भाविकांची मंदिरात रांग  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची माहिती मिळाली आणि मंदिरात गर्दी उसळली
  • भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले
  • भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – अंनिस

सोलापूर  :  देवळातील नंदीने दूध पिलं, हनुमानाने प्रसाद खाल्ला अशा बातम्या किंवा चर्चा आपण अनेकवेळा ऐकल्या असतील. परंतु आता तर गणपती बाप्पा रडू लागल्याचं सांगितलं जात आहे. सोलापुरातील गणपती बाप्पा रडू लागल्याने भाविकांनी होटगी- कुंभारी रस्त्यावरील गणपती मंदिरात तोबा गर्दी केली. सोलापूर येथील होटगी-कुंभारी रस्त्यावरील एरव्ही  शांत असलेल्या गणपती मंदिरात आज अचानक भाविकांची गर्दी वाढू लागली, असा प्रश्न अनेकांना पडला होता.  भाविकांची गर्दी इतकी  का  वाढली याचा शोध घेतल्यानंतर भुवया उंचावणारी बाब सर्वांसमोर आली. देऊळातील गणपती रडत असल्याची माहिती एका भक्तानेे दिली. याच कारणामुळे मंदिरात गर्दी उसळल्याचं पाहायला मिळालं. 

 यावेळी भाविक म्हणाले की, या परिसरात असणाऱ्या गणपतीच्या डोळ्यातून पाणी येत असल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे.  त्यामुळे गणपतीच्या डोळ्यातील पाणी पाहण्यासाठी आम्ही उत्सुकतेपोटी या ठिकाणी मंदिरात येत आहोत.

अधिक वाचा : Govt Jobs: JEE Mainsपरीक्षा दिली ना; मग लेका आर्मीत जा की!

भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – अंनिस

 गणपतीच्या डोळ्यातून अश्रू येत असून, भाविक हे अश्रू पाहण्यासाठी आणि दर्शनासाठी येत असल्याची  माहिती काहीं लोकांनी अंधश्रद्धा निर्मुलन समितीला दिली. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या काही लोकांनी गणपतीच्या मंदिरात जाऊन पाहणी केली. भाविकांनी अथवा नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू, नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे.

अधिक वाचा ; या 1 रुपयाच्या शेअरने बनवले करोडपती, 1 लाखाचे झाले 7.32 कोटी

भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले

मिळालेल्या माहितीनुसार, सदर अफवा बघता बघता अनेक गावात पसरली. सदर माहिती मिळताच भाविकांचा ओघ दर्शनासाठी मंदिराकडे येऊ लागला. एवढच नव्हे तर भाविकांनी लागलीच दर्शनासाठी गर्दी करून हार, श्रीफळ अर्पण केले आहे.

अधिक वाचा : या फॅशन शोमध्ये आदित्य आणि अनुष्का भेटले होते पहिल्यांदा 

ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय घेतल्यानंतर सत्य काय समोर येईल – अंनिस

सदर गणपती मंदिर हे  कुंभारी रोडवरील स्वामीनारायण गुरुकुल स्कूलच्या जवळ सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी बेनक गणपती मंदिर आहे. या गणपतीच्या डोळ्यातून अश्रू वाहत असल्याची बातमी हा हा म्हणता परिसरात पसरली.  ही अफवा असून या मागचे शास्त्रीय कारण काय त्याचा शोध घेतल्यानंतर नेमका प्रकार निदर्शनास येईल असे अंनिसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यानंतर देखील दर्शनासाठी नागरिक आणि भक्त गर्दी करत असल्याचे दिसून येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी