प्रसिद्ध डॉक्टरने वृद्धाला भररस्त्यात काठीने केली बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल

A famous doctor beat an old man with a stick ; वृद्ध व्यक्तीला मारहाण करत असलेल्या मारकुट्या डॉक्टरचे नाव संदीप आडके असं आहे. संदीप आडके हा प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे. तर विजय चौधरी असं गवंडी कामगार असलेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. संदीप आडके या डॉक्टरांने केलेल्या मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले आहेत

A famous doctor beat an old man with a stick
प्रसिद्ध डॉक्टरने वृद्धाला भररस्त्यात काठीने केली मारहाण   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोलापुरात वृद्ध व्यक्तीला प्रसिद्ध डॉक्टरने केली मारहाण
  • मारकुट्या डॉक्टरवर पोलिसात गुन्हा दाखल
  • डॉक्टरने केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल

सोलापूर : अंगावर खरकटे पाणी का टाकले? याचा जाब वृद्ध व्यक्तीने डॉक्टरला विचारल्यावर डॉक्टरचा पारा चढला आणि त्याने थेट काठीने वृद्ध व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. सदर घटना सोलापूरमध्ये घडली आहे. डॉक्टरने मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटकरी सोशल मिडियावर डॉक्टरचा चांगलाच समाचार घेताना दिसत आहेत. दरम्यान, सदर मारकुटा डॉक्टर हा प्रतिष्ठित डॉक्टर असून त्याने  वृद्ध व्यक्तीला केलेल्या मारहाणीचा अनेकजण निषेध करत आहेत. डॉक्टरांकडून झालेल्या मारहाणीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. (doctor beat old man in solapur video gone viral on social media)

अधिक वाचा ; अखंड भारताचे पहिले पंतप्रधान सुभाषचंद्र बोस : Rajnath Singh

डॉक्टरविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वृद्ध व्यक्तीला मारहाण करत असलेल्या मारकुट्या डॉक्टरचे नाव संदीप आडके असं आहे. संदीप आडके हा प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असल्याची माहिती मिळाली आहे. तर विजय चौधरी असं गवंडी कामगार असलेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. संदीप आडके या डॉक्टरांने केलेल्या मारहाणीत चौधरी यांच्या हाताला पाच टाके पडले असून, त्यांना इतर देखील गंभीर दुखापत झाली आहे. मारहाण झाल्यानंतर डॉक्टरविरोधात पोलिसात तक्रार देण्यात आली असून, डॉक्टर संदीप आडके यांच्या विरोधात भादवी कलम 323, 324 504, 506 अनुसार सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संदीप आडके यांनीही पीडित व्यक्तीविरोधात सदर बाजार पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये दारू पिऊन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत होता असा आरोप मारहाण करणाऱ्या डॉक्टरांनी केला आहे.

अधिक वाचा ; सुंदर आणि चमकदार केस हवे आहेत? मग करा हे घरगुती उपाय 

गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधातही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार. डॉक्टर संदीप अडके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पीडित वृद्ध गवंडी कामगार विजय चौधरी यांच्या विरोधात देखील अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. विजय चौधरी हे रस्त्यावरुन जात असताना त्यांच्या अंगावर डॉक्टर आडके यांच्या हॉस्पिटलमधून कुणीतरी खरकटं पाणी टाकलं. अंगावर खरकटे पाणी आल्याने विजय चौधरी यांना राग आला आणि ते खरकटे पाणी कुणी टाकले याचा जाब विचारण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले. त्यानंतर डॉक्टर आणि चौधरी यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर मात्र डॉक्टरने चौधरी यांना फायबर काठीने बेदम मारहाण केली, असा आरोप चौधरी यांनी केला आहे.

अधिक वाचा ; फक्त 7000 रुपयांमध्ये नोकियाने आणला जबरदस्त 5G स्मार्टफोन

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी