Pandharpur Crime । चक्क सासऱ्याने सुनेवर केली बळजबरी, पंढरपूरमध्ये वेबसिरीज 'गंदी बात'सारखी धक्कादायक घटना

Gandi baat in Pandharpur : पंढरपूरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या सासऱ्याने आपल्या सुनेला घरात एकटी पाहून बळजबरीदेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासऱ्याने पकडताचं सुनेने आरडाओरडा केला, त्यानंतर त्याने तिला सोडून दिले

father in law attempts to molest daughter in law
चक्क सासऱ्याने सुनेवर केली बळजबरी,पंढरपूरमधील धक्कादायक घटना  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संबंध न ठेवल्यास आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकीही सासऱ्याने सुनेला दिली
  • वृद्ध सासऱ्याच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
  • पीडित महिलेच्या सासऱ्याने ती घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला

Pandharpur Crime । पंढरपूर : सासऱ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पंढरपूरच्या ग्रामीण भागात घडली आहे. 'गंदी बात' या वेब सीरिजमधील कथानकाशी जुळणारी ही घटना सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरातील ग्रामीण भागात उघडकीस आली आहे. सदर घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून, सासऱ्याच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची चर्चा देखील परिसरात मोठ्या प्रमाणात आहे.

 माझ्याशी संबंध ठेव” असं म्हणत सासऱ्यानेच सुनेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला

 सासऱ्याने आपली सून आंघोळ करत असतानाचा एक व्हिडीओ देखील काढला असल्याचा आरोप सुनेने करत, “तुला माझ्या मुलापासून अपत्य होत नाही, तू माझ्याशी संबंध ठेव” संबंध न ठेवल्यास आंघोळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन, असं देखील म्हटलं असल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, सदर सासऱ्याने सुनेवर बळजबरी करण्याचा प्रयत्न देखील केला असल्याचा आरोप आहे. सदर घटनेप्रकरणी सुनेने सासऱ्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. सुनेने दिलेल्या तक्रारीवरून वृद्ध सासऱ्याच्या  विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित महिलेच्या सासऱ्याने ती घरात एकटी असताना बळजबरी करण्याचा प्रयत्न केला

पंढरपूरच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या पीडित महिलेच्या सासऱ्याने आपल्या सुनेला घरात एकटी पाहून बळजबरीदेखील करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सासऱ्याने पकडताचं सुनेने  आरडाओरडकेली आणि त्यानंतर तिला सोडून दिले. २०  डिसेंबर रोजी सासऱ्याने सून बाथरुममध्ये आंघोळ करत असताना तिचे व्हिडीओ शूटिंग देखील केले असल्याची तक्रार देखील सुनेने केली आहे.

नाहीतर तुझा आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन

तुला माझ्या मुलापासून अपत्य होत नाही, तू माझ्याशी संबंध ठेव, असे म्हणून सासऱ्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. नाहीतर तुझा आंघोळ करत असतानाचा व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देत व्हिडीओ क्लीपच्या आधारे सासऱ्याने सुनेला ब्लॅकमेल करण्याचा देखील प्रयत्न केला.

 

आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती

पीडित महिलेच्या आई-वडिलांनी पंढरपूर येथे ग्रामीण पोलीस ठाण्यात सासऱ्याच्या विरोधात विनयभंग, अत्याचार याबाबत गुन्हा दाखल केला आहे.  पीडित महिला मंगळवेढा येथे माहेरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांना हकिगत सांगितली होती.दरम्यान ,  आरोपी सासऱ्याला पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी