धक्कादायक ! बापानेच केला अल्पवयीन मुलीवर आठ ते नऊ महिने अत्याचार , पुढे जे घडलं ते एकूण अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली

Father rapes minor daughter in pandharpur : बापाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत एक – दोन नव्हे तर तब्बल गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. घटना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे

Father rapes minor daughter in pandharpur
बापानेच केला अल्पवयीन मुलीवर आठ ते नऊ महिने अत्याचार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती
  • गरोदर राहिल्याने वडिलांनी माझा विवाह लावून दिला - पिडीता
  • पोलिसांनी वडील आणि पती या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली

पंढरपूर : राज्यात महिलांवर आणि अल्पवयीन मुलींच्या अत्याचारात वाढ होताना दिसत आहे. दरम्यान , पंढरपूर येथे बापाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केल्याने सदर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली आहे. यापेक्षा पुढे जाऊन बापाने केलेलं कृत्य पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल! कारण मुलीच्या गरोधरपणाचा आरोप आपल्यावर येऊ नये म्हणून त्याने थेट एका तरुणासोबत  घाईघाईत गर्भवती लेकीचा विवाह उरकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर पीडित मुलीने एका बाळाला जन्म दिला असून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी वडील आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात घडलेल्या या घटनेमुळे ग्रामीण भागात एकच खळबळ उडाली आहे.

आठ ते दहा महिन्यांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली होती

बापाने आपल्या अल्पवयीन मुलीसोबत एक – दोन नव्हे तर तब्बल गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. घटना पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात घडली आहे. आपली मुलगी गरोदर राहिली असल्याचं समजताच त्यांनी तिचा विवाह पुणे येथील तरुणाबरोबर लावून दिला.

पिडीतेने पोलिसांना सांगितली अत्याचाराची कहाणी

पिडीतिने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. पीडितेला मुलगी झाली, मात्र ती स्वतः अल्पवयीन असल्यामुळे डॉक्टर आणि पोलिसांनी याबाबत तिच्याकडे चौकशी केली. तेव्हा तिनेतिच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढाचं वाचून दाखवला त्यानंतर पोलिसांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. तिने सांगितले की, गेल्या आठ महिन्यांपासून वडील अत्याचार करत होते. त्यानंतर मी गरोदर राहिल्याने वडिलांनी माझा विवाह लावून दिला. नंतर पतीने देखील माझ्यावर अत्याचार केल्याचा दावा तिने केला आहे. तिने पुढे सांगितले की, माझा विवाह झाल्यानंतर काही महिन्यांतच मला त्रास होऊ लागला. यामुळे मला माहेरी पाठवण्यात आले. त्यानंतर वडिलांनी तिला पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र तिची प्रकृती गंभीर झाली. पुढील उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून वडिलांनी मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेने संताप व्यक्त होत आहे. 

पोलिसांनी वडील आणि पती या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली

पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा विवाह लावून दिल्या प्रकरणी पोलिसांनी वडील आणि पती या दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटकही केली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी