Flood Alert: पंढरपूरात पुराचा धोका, चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली

Chandrabhaga River : भीमा व नीरा खोर्‍यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने भीमा नदीला पूर आल्यामुळे पंढरपूर शहरातील नदीकाठी असलेल्या सखल भागात असलेल्या नागरिक व झोपडपट्टीधारकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.

Flood Alert: Flood risk in Pandharpur, danger in nearby areas of Chandrabhaga
Flood Alert: पंढरपूरात पुराचा धोका, चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली ।   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वीर धरणातून नीरेच्या पात्रात व उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग
  • भीमा नदीला पूर आल्यामुळे पंढरपूर शहरातील नदीकाठी असलेल्या सखल भागात धोका
  • चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत.

सोलापूर : भीमा व नीरा खोर्‍यात गेल्या आठ दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने या भागातील धरणे शंभर टक्के भरली असून यामुळे वीर धरणातून नीरेच्या पात्रात ३३ हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला होता, तर उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे नीरा आणि भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पंढरपूर येथील जुना पूल पाण्याखाली गेला असून चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत. (Flood Alert: Flood risk in Pandharpur, danger in nearby areas of Chandrabhaga)

अधिक वाचा : "...तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी" नितीन गडकरींच्या विधानाने चर्चांना उधाण

भीमा नदीला पूर आल्यामुळे पंढरपूर शहरातील नदीकाठी असलेल्या सखल भागात असलेल्या नागरिक व झोपडपट्टीधारकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे.यामुळे भाविक आणि नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

वीर धरणातून सुमारे ३३ हजार ३८५ क्युसेक्स पाणी सोडण्यात आले होते. ते शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता २४ हजार क्युसेक्स करण्यात आले आहे, तर उजनीतून ४० हजार क्युसेक्सचा विसर्ग भीमा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची पाणी पातळी ३३६०.५३ दलघमी असून उपयुक्त साठ्यात १५५७.७२ दलघमी इतके आहे. उजनीत एकूण १२१ टीएमसी पाणीसाठा असून धरण १०२ टक्के भरले आहे. उजनीत बंडगार्डनमधून २६ हजार तर दौंड येथून ५६ हजार क्युसेक्सचा विसर्ग येत आहे. उजनीतून कालव्याद्वारे २००० क्युसेक्स, सीना-माढा ८०० क्युसेक्स तर भीमा नदीपात्रात ४१,६०० क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे.

अधिक वाचा : जळगावांत गुलाबराव पाटलांच्या स्वागतासाठी शेकडो गाड्यांचा ताफा आणि हजारोंची गर्दी

पंढरपूर नदीपात्रात सध्या नीरा व भीमेचा संगम नीरानृसिंहपूर येथे होत आहे. पंढरपूर शहरात सुमारे २६ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे जुना पूल आणि चंद्रभागा नदीपात्रातील मंदिरेही पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे व्यास नारायण आणि अंबिका झोपडपट्टीधारकांसह परिसरातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे. नगरपालिकेचे कर्मचारी व पोलिसांचा प्रत्येक घाटावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी