११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक

Ganpatrao Deshmukh's health is critical : गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उपचार सुरु असल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या पित्ताशय खडे असून, त्यावरचं त्यांचं ऑपरेशन देखील पार पडलं आहे.

Ganpatrao Deshmukh's health is critical
११ वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुखांची प्रकृती चिंताजनक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु
  • सांगोला मतदारसंघातून एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला
  • सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा १९६२ च्या निवडणुकीत विजय मिळवला

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून एक दोन नव्हे तर तब्बल ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवणारे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख (Ganpatrao Deshmukh) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. गणपतराव देशमुख यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती त्यांचे नातू म्हणजेच डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूरातील  एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकृती अंत्यंत चिंताजनक असल्याकारणाने त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. सध्या गणपतराव देशमुख यांचे वय ९६ वर्षे इतके आहे. एवढं वय असूनही ते आतापर्यंत ते मतदारसंघात फिरत होते, आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तडीस लावण्याचा ते आटोकाट प्रयत्न करत होते.

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून गणततराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु

दरम्यान, गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या आठ ते दहा दिवसांपासून उपचार सुरु असल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या पित्ताशय खडे असून, त्यावरचं त्यांचं ऑपरेशन देखील पार पडलं आहे. मात्र, ऑपरेशन पार पडून देखील सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

नेमकं कोण आहेत गणपतराव देशमुख?

एकाच मतदारसंघातून विधानसभेवर सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या नावावर आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून एक दोन वेळा नव्हे तर तब्बल ११ वेळा त्यांनी विक्रमी विजय मिळवला आहे. गणपतराव देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२६ रोजी झाला. देशमुखांची अत्यंत साधी राहणी होती. गणपतराव देशमुख यांनी तब्बल ५४ वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचबरोबर सांगोल्यातून सगळ्यात पहिल्यांदा १९६२ च्या निवडणुकीत विजय मिळवला. त्यानंतर १९७२ आणि १९९५ या दोन पंचवार्षिक वगळता प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सांगोल्यातील जनतेने देशमुख यांच्यावर खूप प्रेम केलं असल्याचं दिसून आलं आहे. दरम्यान, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून, करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे आबासाहेब देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते

दरम्यान, गणपतराव देशमुख हे अधिक काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८ मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले त्यावेळी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यानंतर १९९९ मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. मात्र, इतके मोठे नेते असताना देखील गणपतराव देशमुख हे अत्यंत साधेपणाने राहत होते. त्यांचे बरेच किस्से हे खूप गाजले देखील आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी