बेरोजगारांसाठी मोठी सुवर्णसंधी , सोलापूर येथे मोठी पदभरती, 'थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

Great job opportunity at Solapur : पदभरती ही वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी होणार आहे. सदर पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी थेट दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं असल्याची माहिती देण्यात आली आहे

Great job opportunity at Solapur
बेरोजगारांसाठी मोठी सुवर्णसंधी ,सोलापूर येथे मोठी पदभरती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उमेदवारांनी क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर इथून प्राप्त केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य
  • मुलाखतीवेळी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे

सोलापूर : महाराष्ट्रात अनेक मुलं शिकून देखील हाताला काम नसल्याने बेरोजगार आहेत. मात्र, आता बेरोजगारांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आली आहे. सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Solapur) इथे लवकरच काही पदांसाठी मोठी पदभरती होणार आहे. या पदभरतीसाठी अधिसूचना (GMC Solapur Recruitment 2021) देखील जारी करण्यात आली आहे.

उमेदवारांनी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे

दरम्यान , सदर पदभरती ही वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी होणार आहे. सदर पदासाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी थेट दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख २३ सप्टेंबर २०२१ रोजी असणार आहे. मुलाखतीचा पत्ता, श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर इथे आहे.

तर अशावेळी एमबीबीएस  उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

उमेदवारांनी एकापेक्षा अधिक विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं असेल तर अशा उमेदवारांसाठी मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे. जर मुलाखतीच्या वेळी कोणताही पदव्युत्तर शिक्षण घेतलेला उमेदवार प्राप्त झाला नाही, तर अशावेळी एम बी बी एस  उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. दरम्यान, पुढे दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी क्लिनिकल विषय पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या उमेदवारांना मिळणार प्राधान्य देण्यात येणार असल्याचंही कळवण्यात आलं आहे.

या उमेदवारांनाही देण्यात येणार प्राधान्य

उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय महाविद्यालयातून केली असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर उमेदवारांनी पदवी किंवा पदव्युत्तर पदवी ही शासकीय महाविद्यालय सोलापूर इथून प्राप्त केली असेल तर अशा उमेदवारांना देखील अधिक प्राधान्य देण्यात येणार असल्याचं कळवण्यात आलं आहे. 

मुलाखतीवेळी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार

मुलाखतीवेळी उमेदवारांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे आणि त्यानंतर उमेदवारांना पुढच्या सर्व मुलाखतींसाठी उपस्थित राहावं लागेल. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी