harshvardhan patils factory office, सोलापूर : संतापलेल्या शेतकऱ्यांनी थेट भाजप नेत्याच्या कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर या साखर कारखान्याच्या कार्यालयाची संतप्त शेतकऱ्यांनी तोडफोड केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उसाच्या एफआरपीची रक्कम न मिळाल्यामुळे सोलापूरमधील ऊस उत्पादक शेतकरी कमालीचे संतापले असून, यातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, साखर कारखान्यांकडून एफआरपी रक्कम मिळत नसल्यामुळे शेतकरी आंदोलनं देखील करत आहेत. मात्र, या आंदोलनाची दाख्ल कोणीही घेत नसल्याने शेतकरी संतापला असल्याचे दिसून येत आहे. आणि अशाच कारणामुळे संतापलेल्या एका शेतकऱ्याने थेट भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्याशी संबंधित इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. सदर घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मिडियावरती व्हायरल होत आहे.
अधिक वाचा ; २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात शिवसेनाच जिंकणार
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रेश्वर साखर कारखान्याने मागील ५ महिन्यापासून शेतकऱ्यांच्या ऊसाच्या एफआरपीची रक्कम दिली नाही. शेतकऱ्यांनी वारंवार कारानाखान्याकडे एफआरपीची रक्कम मागितली असताना देखील कारानाखान्याने शेतकऱ्यांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाला असल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, इंद्रेश्वर साखर कारखान्याच्या कार्यालयात घुसून शेतकऱ्याने हेल्मेटने कार्यालयातील काचांची तोडफोड केली. संतप्त शेतकऱ्यांनी कार्यालयातील काचेच्या दरवाजाची तोडफोड करत रोष व्यक्त केला आहे.
अधिक वाचा : ITBP Job: 10 वी उत्तीर्ण गडी कमावणार महिना 60 हजाराचा पगार
त्याचबरोबर बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावातील इंद्रेश्वर साखर कारखान्याला टाळे ठोको आंदोलनासाठी शेतकरी गेटवर बसले आहेत. त्यानंतर संतप्त शेतकऱ्याने हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यालयात जाऊन तोडफोड केली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तोडफोड करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी सदर घटनेचा व्हिडीओ देखील तयार केला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील केला आहे.
अधिक वाचा ; डोंबिवलीत 2 अल्पवयीन मुलांनी चोरले मोबाईल, पोलिसांकडून अटक