व्वा रे मुख्याध्यापक ! पाच लाख आणण्यासाठी बायकोला पाठवलं माहेरी, बायको नसताना दुसरीच आणली घरी

सोलापूर
भरत जाधव
Updated Aug 29, 2021 | 15:10 IST

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीमध्ये पेशाने मुख्याध्यापक असलेल्या एका व्यक्तीने अजब-गजब काम केले आहे.

Headmaster Married with another women for money
व्वा रे मुख्याध्यापक ! पाच लाख आणण्यासाठी बायकोला पाठवलं माहेरी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पैशासाठी मुख्याध्यापक आपल्या पत्नीचा दररोज छळ करायचा.
  • आरोपी सध्या म्हैसगाव येथील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.
  • विनाअनुदानित असल्याने बापू अडसूळ यांना पगार मिळत नव्हता.

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीमध्ये पेशाने मुख्याध्यापक असलेल्या एका व्यक्तीने अजब-गजब काम केले आहे. हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या या नराधमाने थेट दुसरा संसार थाटला आहे. व्यवसायासाठी पाच लाख रुपयेण आणण्यावरुन पत्नीचा छळ करणाऱ्या या मुख्याध्यापकाने परस्पर दुसरा संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.  

पैशासाठी मुख्याध्यापक आपल्या पत्नीचा दररोज छळ करायचा. नवऱ्याच्या सततच्या पैशांच्या मागणीला कंटाळून विवाहिता माहेरी निघून गेली होती. पण बहादराने हीच संधी साधत थेट दुसरे लग्न केलं, असा आरोप पीडित महिलेने केला आरोप आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापक पतीसह कुटुंबातील सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडीमध्ये राहणाऱ्या बापू अडसूळ नावाच्या मुख्याध्यापकावर दुसरे लग्न केल्याचा आरोप आहे. तक्रारदार महिला योगिता बापू अडसूळ यांचा विवाह 2012 मध्ये अंकोली येथील बापू अडसूळ यांच्यासोबत झाला होता. आरोपी सध्या म्हैसगाव येथील विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे.

पत्नीकडे पाच लाखांसाठी तगादा

तक्रारानुसार, शाळा विनाअनुदानित असल्याने बापू अडसूळ यांना पगार मिळत नव्हता. त्यामुळे त्यांना कॉम्प्युटरचा व्यवसाय सुरु करायचा होता. त्यासाठी त्यांनी पत्नीचा छळ करण्यास सुरुवात केली. माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी त्यांनी पत्नीमागे तगादा लावला.  महिलेच्या वडिलांनी आरोपीला आधी एक लाख रुपये, तर नंतर तीन लाख रुपये दिल्याची माहिती आहे. तरीही महिलेचा तिच्या सासरच्या कुटुंबीयांकडून छळ सुरू होता. पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदार पत्नी माहेरी निघून गेली. हीच संधी साधत आरोपीने परस्पर दुसरं लग्न केल्याचा आरोप आहे.

पतीसह सासरच्या सात जणांवर गुन्हा

या प्रकरणी योगिता अडसूळ यांना आरोपी पती बापू अडसूळसह घरातील सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. कुर्डूवाडी पोलिसांनी हुंडा प्रतिबंधक कायद्यासह, कौटुंबिक हिंसाचार अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास कुर्डूवाडी पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी