husband killed wife and daughter पत्‍नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पती फरार , सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

husband killed wife and daughter : सकाळी घरातील सर्वजण उठल्यावर पहिले असता लक्ष्मी व श्रृती या दोघींचे सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. त्यानंतर हा खुनाचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे.

husband killed wife and daughter
पत्‍नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पती फरार   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपला होता.
  • लक्ष्मी व श्रृती या दोघींचे सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आला
  • आरोपी अण्णा माने याच्या तपासासाठी तीन पोलीस पथकं पाठवली आहेत

husband killed wife and daughter सोलापूर : पत्नी व आपल्या मुलीचा डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्काद्यक घटना समोर आली आहे.  सोलापुर जिल्ह्यात हा भयानक प्रकार सामोये आला आहे. पतीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या करण्याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. खून करून पतीने पलायन देखील केले आहे.  भिलारवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे सदर कुटुंब राहत होते. लक्ष्मी अण्णा माने वय ३० वर्षे आणि श्रुती अण्णा माने वय १२ वर्षे असं खून झालेल्या पत्नीं आणि मुलीचे नाव आहे. अण्णा माने असे संशयित आरोपीचे नाव असून, निर्घुण खूनाच्या घटनेमुळे करमाळा तालुक्यासह जिल्ह्यात  खळबळ उडाली आहे. सोमवार ८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४५ मिनिटाच्या सुमारास मौजे भिलारवाडी येथील मृताच्या राहत्‍या घरात ही घटना उघडकीस आली आहे. करमाळा पोलिसांत या घटनेची फिर्याद कमलेश गोपाळ चोपडे याने दिली असून सदर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपला होता.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण माने कुटुंब हे एकत्रित भिलारवाडी येथे राहत होते.  माने यांच्या कुटुंबात संशयित आरोपी आण्णा माने , मयत लक्ष्मी माने व श्रृती माने, मुलगा रोहित माने व मृताची सासू हे राहत होते. मुलगा रोहित हा आजी सोबत दुस-या खोलीत झोपले होते. तर , दोन्ही मृत व संशयित आरोपी आण्णा हे एका खोलीत झोपले होते.

लक्ष्मी व श्रृती या दोघींचे सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आला

सकाळी घरातील सर्वजण उठल्यावर पहिले असता लक्ष्मी व श्रृती या दोघींचे सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह आढळून आले. त्यानंतर हा खुनाचा भयानक प्रकार उघडकीस आला. मात्र, पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास संशयित आण्णा माने हा मोटारसायकलवरून निघून गेला असल्याचं मुलगा रोहित माने याने पाहिले होते. त्यामुळे, या प्रकरणात अण्णा माने यानेच हत्याराने अज्ञात कारणाने दोघींच्या डोक्यात मारले आणि गंभीर जखमी करून जीवे मारल्‍याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

आरोपी अण्णा माने याच्या तपासासाठी तीन पोलीस पथकं पाठवली आहेत

करमाळा पोलिसांनी संशयित आरोपी अण्णा माने याच्या तपासासाठी तीन पोलीस पथकं पाठवली आहेत. अद्याप आण्णा माने हा फरार झाला आहे.  दरम्यान,  मृत लक्ष्मी यांचा भाऊ कमलेश चोपडे यांनी संशयित आरोपी अण्णा मानेच्या विरोधात दोघींचा खून केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस करीत आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी