म्हणून पतीने केलं पत्नीचं टक्कल, सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

husbund shaved wife's hair, Filed a case against husbund : मे महिन्यात पीडितेचा विवाह जोड बसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही त्यांचा संसार हा सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. आणि पीडितेच्या पतीने संशय घेत, तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले.

husbund shaved wife's hair, Filed a case against husbund
पुरुषाकडे पाहू नये म्हणून पतीने केली पत्नीची टक्कल  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वीस वर्षीय पत्नीचे पतीने चक्क टक्कल केले आहे
  • पुरुषाकडे पाहू नये म्हणून केले पत्नीचे टक्कल
  • पोलीस ठाण्यात सासू, सासरे आणि पतीविरोधात गुन्हे दाखल

सोलापूर  : सोलापूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वीस वर्षीय पत्नीचे पतीने चक्क टक्कल केले आहे. पुरुषाकडे पाहू नये म्हणून पतीने पत्नीची टक्कल केली असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब तीन महिन्यानंतर जेव्हा पत्नी जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आली, त्यावेळी उघडकीस आली. पत्नीने सर्व घडलेला प्रकार पोलीस ठाण्यात आल्यावर सांगितला तेव्हा ऐकून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला. पीडित पत्नीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, सासू राजिया सत्तार चौधरी, सासरे सत्तार चौधरी आणि पती कलीम सत्तार चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा ; "40 गाव सोडा... महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नेमकी काय घडली घटना?

मे महिन्यात पीडितेचा विवाह जोड बसवण्णा चौकातील कलीम चौधरी या तरुणाशी झाला होता. लग्नानंतर काही त्यांचा संसार हा सुखात सुरु होता. मात्र, काही दिवसांनी पतीने पत्नीवर संशय घेण्यास सुरुवात केली. आणि पीडितेच्या पतीने संशय घेत, तिला तुझे केस मला आवडत नाहीत, असे म्हणत तिला केस काढून टक्कल करायचे असल्याचे सांगितले. हे ऐकून पत्नीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने पतीला डोक्यावरील केसं काढण्यास सक्त नकार दिला. त्यानंतर पतीने रागाच्या भरात तिच्याशी चक्क बोलणे बंद केले. जेवण न करणे मारहाण करणे अशी वागणूक सुरु केली. पतीने सुरु केलेल्या अशा वागणुकीमुळे पत्नी कंटाळली आणि तिने केसं काढण्यास होकार दिला. तिचे केस कापण्यासाठी पार्लरवाल्याला बोलावण्यात आले आणि त्यावेळी पिडीतेन विरोध केला नंतर ती नाईलाजाने शांत राहिली, अशी माहिती पीडितेच्या आई-वडिलांनी दिली आहे. यापुढे जाऊन सगळेजण तिला एकटीला घरी कोंडून व्यवसायासाठी जात होते. तरीही तिच्यावर नवरा संशय घेत होता.

अधिक वाचा ; कोहलीने घातला इतका महागडा टीशर्ट, किंमत ऐकून व्हाल हैराण

पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली

मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसानंतर माहेरच्या लोकांनी कार्यक्रमानिमित्त पीडितेला व जावयाला घरी बोलावले. त्यावेळी पतीने पीडितेला घरी नेऊन सोडले. त्यावेळी पीडितेने आपल्याबरोबर झालेली घटना आई-वडिलांना सांगितली. आपल्या मुलीचे केस जावयाने आणि त्यांच्या कुटुंबीयांनी काढल्याचे पिडीतेच्या कुटुंबियांना समजताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांनी तात्काळ पोलीस ठाणे गाठले आणि पोलीस ठाण्यात पती, सासू सासरे यांच्या विरोधात तक्रार दिली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अधिक वाचा ; टाटा मोटर्सनी लॉंच केली भारतातील पहिली टफरोडर आयसीएनजी कार

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी