Ranveer Singh: 'अभिव्यक्तीच्या नावाखाली न्यूड फोटो सेशन चालतं तर बुरखा का नको?', अबू आझमींचा सवाल

सोलापूर
रोहित गोळे
Updated Jul 23, 2022 | 20:53 IST

Abu Azmi Criticized Ranveer Singh: अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात न्यूड फोटो सेशन खपवून घेतलं जातं तर धर्माने मान्यता दिलेला बुरखा का नको? असा सवाल अबू आझमी यांनी केला आहे.

if nude photo sessions are conducted in name of expression why not burkha mla abu azmi asked
'अभिव्यक्तीच्या नावाखाली न्यूड फोटो चालता तर बुरखा का नको?'  |  फोटो सौजन्य: Facebook
थोडं पण कामाचं
  • अभिनेता रणवीर सिंगने केलं न्यूड फोटो सेशन
  • रणवीर सिंगच्या न्यूड फोटो सेशनवर अबू आझमीची टीका
  • न्यूड फोटो सेशन चालतं तर बुरखा का नाही? अबू आझमींचा सवाल

Abu Azmi: सोलापूर: 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली देशात न्यूड फोटो सेशन खपवून घेतलं जातं तर धर्माने मान्यता दिलेला बुरखा का नको?' असं म्हणत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगवर (Ranveer Singh) टीका केली आहे. (if nude photo sessions are conducted in name of expression why not burkha mla abu azmi asked)

'या देशामध्ये लिव्ह-इन रिलेशनशिप, समलैंगिक विवाह अशा प्रवृत्ती, गोष्टींना मान्यता आहे. मात्र, इस्लाम धर्माने ज्या संस्कृतीला मान्यता दिली आहे त्यावर देशात बंदी घालण्यात आली आहे. आज भारतभर अनेक हिंदू राजा-महाराजांच्या घरातील स्त्रिया घुंगट परिधान करतात आणि हीच आपली भारतीय संस्कृती आहे.' असं म्हणत अबू आझामी यांनी बुराख्याविषयी भाष्य केलं. ते सोलापुरात बोलत होते.

अधिक वाचा: Nude Photoshoot रणवीरच नाही तर या सेलिब्रिटींनीही केले आहे न्युड फोटो शूट

रणवीर सिंहचं न्यूड फोटोशूट

अभिनेता रणवीर सिंह (Actor Ranveer Singh) हा  त्याच्या विचित्र स्टाइलने नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या कपड्यांची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू असते. बऱ्याचदा रणवीर त्याच्या हटक्या कपड्यांमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर देखील येतो. आता पुन्हा एकदा रणवीर चर्चेत आला आहे. पण यावेळी तो त्याच्या कपड्यांवरून नाहीतर त्याच्या फोटोशूटमुळे चर्चेत आला आहे. त्यानं एका मॅगझीनसाठी फोटोशूट केलं आहे. हे फोटो समोर येताच सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे.

अधिक वाचा: Vijay Deverakonda home : 'या' साऊथ सुपरस्टारचे घर अतिशय सुंदर असून बारपासून बेडरूमपर्यंत प्रत्येक कोपरा न कोपरा आहे आलिशान

रणवीर सिंहनं अंगावर एकही कपडा न घालता हे फोटोशूट केलं आहे. म्हणजेच रणवीरनं चक्क न्यूड फोटोशूट केलं आहे. यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. रणवीर आज त्याच्या व्हायरल न्यूड फोटोमुळे सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. रणवीर सिंहचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

पेपर नावाच्या अमेरिकी मॅगझीनसाठी रणवीर सिंहने न्यूड फोटो शूट केलं आहे. या फोटोशूटमधील काही फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये रणवीर केवळ अंतर्वस्त्रावर दिसत आहे. तर काही फोटोंमध्ये तो पूर्णपणे न्यूड असल्याचं दिसून येत आहे.

अधिक वाचा: Kangana Ranaut कशी बनली इंदिरा गांधी?, Emergency च्या फर्स्ट लुकचा मेकिंग व्हिडिओ आऊट

रणवीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर 

दरम्यान, आता रणवीर सिंग हा टोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी त्याला ट्रोल करताना आपल्या संस्कृतीचे दाखले दिले आहेत. तर काही जणांनी त्यावर वेगवेगळे मीम्स देखील बनवले आहेत. त्यामुळे रणवीर आता सोशल मीडियावर फारच चर्चेत आला आहे. 

या सगळ्यावर रणवीर सिंगने अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, आता याबाबत रणवीरचं नेमकं काय म्हणणं आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी