पंढरपूरच्या निवडणूक : नेहमी चर्चेत असणाऱ्या अभिजीत बिचुकलेंना पडली 'एवढी' मते

सोलापूर
अजहर शेख
Updated May 03, 2021 | 16:51 IST

In the Pandharpur by-election, Abhijeet Bichukale votes : बिचुकले यांनी पंढरपुर मंगवेढा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली असून, बिचुकले यांना या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने हार पत्करावी लागली आहे.

In the Pandharpur by-election, Abhijeet Bichukale votes
पंढरपूरच्या निवडणुकीत अभिजीत बीचुकलेंना पडली 'एवढी' मते  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • १३७ मते पडल्याने त्याचं डिपॉजिट देखील जप्त झाले
  • ‘राष्ट्रपती पदासाठी माझे नाव घोषित करावे’ – अभिजीत बिचुकले
  • लोकसभेच्या ४८ जागा आणि विधासभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचं बॅनर त्यांनी सातारा येथे लावले होते.

पंढरपुर : पंढरपुर मंगळवेढा (pandharpur mangalavedha)  मतदारसंघाचे आमदार भारत नाना भलके यांचे निधनानंतर झालेल्या  पोटनिवडणुकीचे निकाल देखील हातात आले आहेत. सदर निवडकीत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. महाविकासआघाडी कडून भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ दादा भालके (bhagirath bhalke) यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे (samadhan avatade) यांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, या निवडणुकीत भाजपचे उमेदवार समाधान आवताडे हे विजयी झाले आहेत. सदर निवडणुकीत १९ उमेदवार आपले नशीब आजमावत होते. मात्र, चर्चा होती ती अभिजीत बिचुकले यांची. अभिजीत बिचुकले हे नाव सतत चर्चेत असतं. अभिजीत बिचुकले यांनी आज अनेक निवडणुका लढविल्या आहेत. मात्र, त्यांना यश मिळत नसल्याचे पाहायला मिळाले आहे. तरीदेखील बिचुकले यांनी आपली जिद्द सोडली नसून, त्यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक लढवली असून, नेमकं त्यांना या निवडणुकीत किती मते मिळाली पाहूया.

अभिजीत बिचुकले यांना नेमकं किती मते मिळाली?

अभिजीत बिचुकले यांनी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी नगरसेवक पदापासून ते खासदार पदापर्यंतच्या निवडणुका लढवल्या आहेत. बिचुकले यांनी पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक देखील लढवली असून, बिचुकले यांना या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने हार पत्करावी लागली आहे. त्यांना या निवडणुकीत अवघी १३७ मतं पडली आहेत. दरम्यान, १३७ मते पडल्याने त्याचं डिपॉजिट देखील जप्त झाल असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, बिचुकले यांचे डिपॉजिट जप्त झाल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

‘राष्ट्रपती पदासाठी माझे नाव घोषित करावे’ – अभिजीत बिचुकले

दरम्यान, काही वर्षापूर्वी बिचुकले यांनी थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले होते. त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं होत की, ‘राष्ट्रपती पदासाठी माझे नाव घोषित करावे’ अशी विनंती बिचुकले यांनी केली होती.  

बिचुकले यांच्या या बॅनरची मोठी चर्चा

२०१९ मध्ये अभिजीत बिचुकले यांच्या एका बॅनरची मोठी चर्चा राज्यभर रंगली होती. बिचुकले यांच्या या बॅनरमध्ये मजकूर पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. २०१९ च्या लोकसभेच्या ४८ जागा आणि विधानसभेच्या २८८ जागा लढवणार असल्याचं बॅनर त्यांनी सातारा येथे लावले होते. दरम्यान, त्यांनी २०१९ चा मुख्यमंत्री देखील मीच ठरवणार असल्याचं बॅनरमध्ये लिहिले होते. त्यामुळे त्यांच्या या बॅनरची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी