कार्तिकी एकादशी: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा; कोरोनाचे संकट दूर कर, उपमुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं

सोलापूर
भरत जाधव
Updated Nov 15, 2021 | 08:49 IST

Kartiki Ekadashi 2021 : कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi ) निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा(worship) संपन्न झाली.

Chief Minister Ajit Pawar worship of Lord Vitthal
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा  |  फोटो सौजन्य: फेसबुक
थोडं पण कामाचं
  • कोरोनाचे संकट दूर कर, उपमुख्यमंत्र्यांचं पांडुरंगाला साकडं
  • मानाचे वारकरी म्हणून नांदेड जिल्ह्यातील कोंडिबा टोणगे दाम्पत्याला पूजेचा मान
  • कोंडीबा आणि पऱ्यागबाई टोणगे हे मागील 30 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत.

Kartiki Ekadashi 2021 : पंढरपूर : कार्तिकी एकादशीच्या (Kartiki Ekadashi ) निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा(worship) संपन्न झाली. यावेळी मानाचे वारकरी म्हणून नांदेड (Nanded) जिल्ह्यात असलेल्या लोहा तालुक्यातील कोंडिबा टोणगे दाम्पत्याला मान मिळाला. कार्तिकी एकादशी निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुंदर फुलांनी सजवले आहे. आज कार्तिकी एकादशी सोहळा पंढरपुरात साजरा होत आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षी कार्तिकी वारी होऊ शकली नव्हती. तब्बल दोन वर्षांनी कार्तिकी वारीचा सोहळा आज पंढरपुरात पार पडत आहे. 

कार्तिकी वारीचा सोहळ्याच्या निमित्ताने पुण्यातील भाविक राम जांभूळकर यांनी पाच टन फुलांनी मंदिर सजवलं आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा करण्याचा मान नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील निळ गावच्या टोणगे दाम्पत्याला मिळाला आहे. कोंडीबा आणि पऱ्यागबाई टोणगे हे मागील 30 वर्षापासून पंढरीची वारी करत आहेत. शेतकरी दाम्पत्य असलेल्या या मानाच्या वारकऱ्यांनी, 'सगळ्या जगाचे कल्याण होऊ दे' हेच मागणे देवाकडे केले आहे.
अजित पवार यांनी सपत्नीक कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा केली.

पूजा केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. “18-20 महिने मंदिर बंद होती. वारीत खंड पडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब ही मला म्हणायचे हे पुर्वरत व्हायला पाहिजे. मात्र कोरोना कमी होत नव्हता. मात्र, यंदा प्रशासनाला चांगली साथ दिली. सगळ्यांनी एकत्रित ठरवून यात्रा केली. आता मंदिरंही सुरू झाली आहेत. महापूजेमध्येही मी सहभागी झालो. पण, महाराष्ट्रातील जनतेला सांगत आहोत कोरोनाने पुन्हा डोकं वर काढले आहे. युरोपात जास्त पेशंट मिळायला लागलेत. लसीचा दूसरा डोस घेतला पाहिजे. लोक पहिला घेतात आणि दुसरा घेण्याची गरज नाही म्हणतात. पण डब्ल्यूएचओने सांगितले की, बुस्टर डोसची गरज नाही. मुख्यमंत्री आणि प्रशासन यांना सोबत घेण्याचा प्रयत्न करतोय”, असं पवार यांनी सांगितलं. शेतकरी, कष्टकरी जनतेला सुखात ठेव, सर्व जनता सुख समाधानाने राहू दे, असं देखील राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अजित पवारांची प्रतिक्रिया

कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी पंढरपूरकडे येत आहेत, परंतु राज्यातील सामान्य लोकांची जीवन वाहिनी असलेली एसटीने अनेकजण पंढरपूरला येत असतात. परंतु आता राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे. यावेळी एसटीच्या संपाबाबत प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, “देशापातळीवरील एअर इंडिया एवढ्या काम करत होती. ती कंपनी खासगी केली आणि विकली. त्यावर कोणी काहीच बोलत नाही. एसटीची परंपरा 60 वर्षांची आहे, अनेक सरकार आली मात्र अशी मागणी कोणी केली नाही. महामंडळ ते त्याचं काम करत होतं, राज्य सरकारने 1 हजार आणि 500 कोटीची मदत केली.

आम्हाला हे पाहिजेच अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली नाही पाहिजे. त्यांनी दोन पावलं पुढे मागे घेऊन चाललं पाहिजे. आत्महत्या करण्यापर्यंतचा विचार करता कामा नये. प्रवाशांचाही विचार करावा लागतो, कर्मचाऱ्यांचाही विचार करावा लागतो, महागाई वाढतीये त्याचा फटका हा सर्वसामान्यांन बसतोय. तुटेपर्यंत ताणू नये. मुख्यमंत्र्याचं ऑपरेशन झाले त्यांना विश्नांती घ्यायला सांगितली आहे. अनिल परब आणि आमचे सहकारी सहकार्य करत आहेत, पवार साहेबही प्रयत्नात आहेत.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी