Collector announces the rules जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर , शासनाचा मात्र अद्यापपर्यंत निर्णय नाही , हजारो भाविक दाखल

Kartiki Ekadashi 2021 district collector announces the rules : काल म्हणजेच (शनिवारी) संध्याकाळी विठ्ठल मंदिरातील देवाचा पलंग काढल्यानं कालपासून देवाच्या २४ तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दर्शनाला हजारो भाविक दाखल झाले आहेत

Kartiki Ekadashi 2021 district collector announces the rules
जिल्हाधिकाऱ्यांकडून कार्तिकी यात्रेची नियमावली जाहीर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अजूनही राज्य सरकारने कार्तिकी यात्रेबाबत कोणतीही घोषणा केली नाही
  • शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले
  • वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या ६५ एकर भागाची सफाई पूर्ण झाली

Collector announces the rules सोलापूर / पंढरपूर : राज्यात गेली २ वर्षे कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे त्याचबरोबर इतर धार्मिक स्थळे पूर्णतः बंद करण्यात आली होती. दरम्यान, इतर धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. गर्दी किंवा रस्त्यवर लोक फिरू नये यासाठी कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी काही कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. दरम्यान, पंढरपूरची आषाढी वारी आणि कार्तिकी वारी (Kartiki Ekadashi २०२१) यांवरही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध लादण्यात आले होते.  कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून वारकरी सांप्रदायाच्या कोणत्याच यात्रा झाल्या नव्हत्या. मात्र, सध्या राज्यात कोरोनाचे रुग्ण अगदी कमी प्रमाणात निघत असल्याने  कार्तिकी वारी घ्यावी ही वारकरी संप्रदायाची मागणी होती.

अजूनही राज्य सरकारने कार्तिकी यात्रेबाबत कोणतीही घोषणा केली नाही

दरम्यान, काल म्हणजेच (शनिवारी) संध्याकाळी विठ्ठल मंदिरातील देवाचा पलंग काढल्यानं कालपासून देवाच्या २४ तास दर्शनाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे दर्शनाला हजारो भाविक दाखल झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र कार्तिकी यात्रेबाबत नोटिफिकेशन काढल्यानं आता शासनाचा आदेश नसला, तरी यंदा कार्तिकी यात्रा होणार का? असा प्रश्न वारकरी संप्रदायाला पडला आहे. अशातच यंदा कार्तिकी एकादशीचा सोहळा १५ नोव्हेंबर रोजी होत असताना अजूनही राज्य सरकारने कार्तिकी यात्रेबाबत कोणतीही घोषणा अद्यापपर्यंत केली नाही.

शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले

कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. गोपाळपूर येथे दर्शन रांगेत १० पत्रा  शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या कडेनं दर्शन रांग गोपालपूरपर्यंत उभारण्यात आलेली आहे. कार्तिकीबाबत प्रशासनाने सर्व तयारी जोरात सुरु केली असून यंदा आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता पाहून दर्शन रांग आणि इतर तयारी सुरु केली आहे. 

वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या ६५  एकर भागाची सफाई पूर्ण झाली

अजूनही शासनानं कार्तिकीबाबत कोणतीही घोषणा केली नसली तरी प्रशासनानं मात्र कार्तिकी होणार असल्याचं नोटिफिकेशन काढल्यानं यंदा कार्तिकी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणार ही वारकरी संप्रदायाला प्रशासनाकडून खास दिवाळी भेट ठरणार आहे. वारकऱ्यांचे निवासस्थळ असणाऱ्या ६५  एकर भागाची सफाई पूर्ण झाली आहे. येथील ३५० प्लॉटचे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. यात्रेसाठी येणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याशिवाय मंदिरात शासकीय महापूजेच्या वेळी हजर राहणाऱ्या सर्वांची RTPCR चाचण्या केल्या जाणार असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी