पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रा भरणार , 'या 'मंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा

kartiki ekadashi 2021 district collector announces the rules :तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या १५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे.

kartiki ekadashi 2021 district collector announces the rules
पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रा भरणार , 'या 'मंत्र्यांच्या हस्ते होणार महापूजा   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कार्तिकी यात्रेस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदाय आणि व्यापारी यांनी केली होती
  • जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दाखविला हिरवा कंदील
  • शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले

पंढरपुर : तब्बल दोन‌ वर्षानंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार असल्याने वारकरी संप्रदायात आनंदाचे वातावरण आहे. येत्या १५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा होईल असं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी ( kartiki ekadashi ) यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. राज्यात गेली २ वर्षे कोरोनाचे सावट असल्याने मंदिरे त्याचबरोबर इतर धार्मिक स्थळे पूर्णतः बंद करण्यात आली होती. दरम्यान, इतर धार्मिक कार्यक्रमही रद्द करण्यात आले होते. गर्दी किंवा रस्त्यवर लोक फिरू नये यासाठी कडक लॉकडाऊन देखील करण्यात आला होता. याशिवाय गर्दी टाळण्यासाठी काही कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडण्याचा निर्णय सरकार आणि प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे रुग्ण  कमी असल्याने यात्रेला पराबनागी देण्यात आली आहे.

कार्तिकी यात्रेस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदाय आणि व्यापारी यांनी केली होती

गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचे रुग्ण राज्यात मोठ्या प्रमाणात असल्याने यात्रेला परवानगी देण्यात आली नव्हती. वारकरी संप्रदाय आणि व्यापारी वर्गातील सर्व लोक नाराज होते. गत काही महिन्यांपासून कोविड १९ ची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने येथे लावण्यात आलेले अनेक निर्बंध कमी केले आहेत. त्यामुळे, कार्तिकी यात्रेस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदाय आणि व्यापारी यांनी केली होती. त्याचबरोबर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देखील कार्तिक यात्रा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दाखविला हिरवा कंदील

दरम्यान प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी कोरोनाच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत यात्रा भरण्यास परवानगी मिळावी असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी पाठवलेल्या प्रस्तावाला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे , सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. 

शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले

कोरोना आणि इतर रोगराईचा धोका पाहून चंद्रभागेमध्ये वाहते पाणी ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाला देण्यात आले आहेत. शहर आणि मंदिर परिसरात आरोग्याबाबत विशेष खबरदारी घेण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले आहेत. गोपाळपूर येथे दर्शन रांगेत १० पत्रा  शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून रस्त्याच्या कडेनं दर्शन रांग गोपालपूरपर्यंत उभारण्यात आलेली आहे. कार्तिकीबाबत प्रशासनाने सर्व तयारी जोरात सुरु केली असून यंदा आठ ते दहा लाख भाविक येण्याची शक्यता पाहून दर्शन रांग आणि इतर तयारी सुरु केली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी