शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन

पाच दशकांपेक्षा जास्त काळ आमदार राहिलेला आदर्श राजकारणी अर्थात शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांना सर्वजण आबा या नावाने ओळखत होते. ते ९४ वर्षांचे होते.

Longest serving MLA from Maharashtra Ganpatrao Deshmukh passes away 
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन 
थोडं पण कामाचं
  • शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन
  • ते ९४ वर्षांचे होते
  • पाच दशकांपेक्षा जास्त काळ आमदार राहिलेला आदर्श राजकारणी

सोलापूर: पाच दशकांपेक्षा जास्त काळ आमदार राहिलेला आदर्श राजकारणी अर्थात शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन झाले. त्यांना सर्वजण आबा या नावाने ओळखत होते. ते ९४ वर्षांचे होते. Longest serving MLA from Maharashtra Ganpatrao Deshmukh passes away 

अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख आजारी होते. सोलापूरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आदर्श राजकारण हे त्यांचे वैशिष्ट्य होते. यामुळेच ते वारंवार निवडणूक जिंकत राहिले.

महाराष्ट्राच्या विधानसभेची पहिली निवडणूक ते जिंकले. यानंतरच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता तब्बल ११ वेळा गणपतराव देशमुख आमदार झाले. ते पाच दशकांपेक्षा जास्त काळ महाराष्ट्राच्या विधानसभेचे सदस्य राहिले. दोन वेळा ते मंत्री झाले. 

एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेले गणपतराव देशमुख हे देशातील दुर्मिळ राजकारण्यांपैकी एक आहेत. सहकार क्षेत्र, तालुक्याचा पाणी प्रश्न आणि इतर विकास योजना यासाठी ते अविश्रांत काम करत राहिले. विरोधी पक्षात राहूनही प्रभावी काम करता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे गणपतराव देशमुख. मंत्रीपद गेल्यानंतर लगेच सरकारी वाहन परत करणाऱ्या गणपतरावांनी आनंदाने एसटीतून प्रवास केला.

वयामुळे काम करणे अशक्य असल्याचे सांगत २०१९ची विधानसभा निवडणूक लढवण्यास गणपतरावांनी नकार दिला. पण अनेकांचा २०१९ मध्येही त्यांनीच निवडणूक लढवावी असा आग्रह होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी