Pandharpur: पोलिसांच्या रूपात भेटला विठ्ठल; आषाढी वारीत हरवलेल्या १६०० भाविकांची पोलिसांनी घडवून आणली भेट

Maharashtra Police: नुकत्याच पार पडलेल्या आषाढी एकादशी दरम्यान अनेक भाविक हे गर्दीत रस्ता चुकले होते अशा परिस्थितीत त्यांना महाराष्ट्र पोलिसांनी मदत केली आहे.

maharashtra police help around 1600 devotees to reunited with their family during ashadhi ekadashi pandharpur
पोलिसांच्या रूपात भेटला विठ्ठल; आषाढी वारीत हरवलेल्या १६०० भाविकांची पोलिसांनी घडवून आणली भेट  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • आषाढी वारीत भाविकांना पोलिसांच्या रुपात भेटला विठ्ठल
  • महाराष्ट्र पोलिसांच्या मिसिंग सेलने हरवलेल्या तब्बल १६०० हून अधिक भाविकांची त्यांच्या नातेवाईकांसोबत भेट घडवून आणली

Police helps devotees to reuinted with family during ashadhi ekadashi: १० जुलै २०२२ रोजी आषाढी एकादशी पार पडली. एकादशीच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होत विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांना वारी करता आली नव्हती पण यंदाच्या वर्षी कुठलेही निर्बंध नसल्याने भाविक मोठ्या उत्साहात पंढरपुरात दाखल झाले होते. मात्र, या वारी दरम्यान १६०० हून अधिक भाविक हे गर्दीत हरवले होते. कुणी वाट चुकलं होतं तर कुणी आपल्या नातेवाईकांपासून वेगळे झाले होते. अशा परिस्थितीत महाराष्ट्र पोलिसांचं पथक या भाविकांच्या मदतीसाठी धावून आलं. (Maharashtra police helped around 1600 devotees reunited with their families during ashadhi ekadashi pandharpur)

पोलिसांनी स्थापन केलेल्या मिसिंग सेलने या सर्व भाविकांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेट घडवून आणली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक तेजस्व सातपुते यांनी ग्रामीण पोलिसांची एक स्पेशल मिसिंग सेलची टीम स्थापन केली होती. ही स्पेशल सेल वारी दरम्यान वाट चुकलेल्या वयोवृद्ध, लहान मुले यांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

अधिक वाचा : "विधानपरिषदेत एका पक्षाचे तीन आमदार फुटले, तीन मतांसाठी २१ कोटी" अमोल मिटकरींच्या दाव्याने खळबळ

यंदाच्या आषाढी वारी दरम्यान जवळपास १ हजार ६४० नागरिक हरवल्याची तक्रार पोलिसांच्या मिसिंग सेलकडे दाखल झाली होती. यानंतर पोलिसांच्या टीमने या सर्व बेपत्ता झालेल्या नागरिकांचा शोध घेत त्यांना त्यांच्या नातेवाईकांसोबत भेट घडवून आणली आहे. 

अधिक वाचा : राज्यात तब्बल 'एवढ्या' आत्महत्या, मराठवाड्याचा आकडा मोठा

आषाढी वारी निमित्त संपूर्ण राज्यभरातून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक पायी वारी करत असतात. गेल्या दोन वर्षांत (२०२० आणि २०२१) मध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक निर्बंध लागू होते. पण यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव नसल्याने निर्बंधमुक्त वारी झाली. पोलिसांच्या अंदाजानुसार, यंदाच्या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी १० जुलै रोजी महाराष्ट्राच्या विविध भागातून आणि शेजारील राज्यांतून सुमारे १५ लाख भाविक पंढरपुरमध्ये दर्शनासाठी दाखल झाले होते.

गर्दी भरपूर असल्याने वारी दरम्यान लहान मुले, वयोवृद्ध हे वाट चूकतात. गर्दीमुळे वाट चुकलेल्या या भाविकांच्या मदतीसाठी पोलीस धावून आले आणि त्यांनी या वाट चुकलेल्या भाविकांना त्यांच्या नाईवाईकांची भेट घडवून आणली. अशा प्रकारे वारी दरम्यान या भाविकांच्या मदतीला खाकी वर्दीच्या रुपात विठ्ठलच आले असल्याचं बोललं जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी