मनाला चटका लावणारी बातमी, हरियाणात स्पर्धेदरम्यान मैदानात धावताना कोसळला महाराष्ट्रातील धावपटू

Maharashtra runner dies while running in competition : हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता.या स्पर्धेत बंडू हा धावत असताना तो अचानक मैदानात कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला

Maharashtra runner dies while running in competition
स्पर्धेदरम्यान मैदानात धावताना कोसळला महाराष्ट्राती धावपटू  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हरियाणात गेला होता
  • महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत इतरही कामे करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायचा
  • स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला

पंढरपूर : महाराष्ट्रातील धावपटू बंडू वाघमोडे याचा मृत्यू झाला असून, क्रीडा क्षेत्रातील ही अत्यंत धक्कादायक आणि मनाला चटका लावणारी बातमी आहे. दरम्यान, बंडू वाघमोडे याच्या मृत्यूने क्रीडा क्षेत्रासह महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. धावपटू बंडू वाघमोडे (Runner Bandu Waghmode) याचा हरियाणात (Haryana) मृत्यू झाला आहे.  स्पर्धा सुरू असताना बंडू वाघमोडे हा मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हरियाणात गेला होता

बंडू वाघमोडे हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता आणि तो अवघ्या २१ वर्षांचा होता. आपल्या जिद्द आणि चिकाटीमुळे तो यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न करत होता. हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बंडू वाघमोडे हा हरियाणात गेला होता. धावपटू बंडू वाघमोडे हा सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील निवासी होता.

महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत इतरही कामे करुन आपल्या कुटुंबाचा गाडा चालवायचा

मिळालेल्या माहितीनुसार, बंडू वाघमोडे हा अंत्यत शांत स्वभावाचा होता. तो सोलपुर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील असून त्याचे वडील हे मेंढपाळ असल्याची माहिती मिळाली आहे. बंडू याला सैन्य दल किंवा पोलीस दलात जाण्याची खूप इच्छा होती. मात्र, काळाने घात केल्याने त्याचे आणि त्याच्या कुटुंबियांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. बंडू हा महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता आणि त्यासोबतच इतरही कामे करुन आपल्या कुटुंबाचं उदर्निर्वाह करण्यासाठी वडिलांना हातभार देखील लावत असल्याचं त्याच्या गावातील नागरिकांनी दिली आहे.

स्पर्धेत धावत असताना अचानक मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला

हरियाणातील रोहतक येथे आंतरराज्य मैदानी स्पर्धेत त्याने सहभाग घेतला होता. या स्पर्धेत बंडू वाघमोडे हा धावत असताना तो अचानक मैदानात कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. बंडू वाघमोडे याच्या मृत्युचं नेमकं कारण काय आहे हे समजू शकलेलं नाहीये. बंडू वाघमोडे याचे पार्थिव लवकरच सोलापूर येथे आणण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच झाला होता पैलवानाचा मृत्यू

 १९९२ साली महाराष्ट्र केसरी किताब पटकावणारे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील पैलवान आप्पालाल शेख (appalal shaikh) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र केसरी सह राष्ट्रकुल स्पर्धेत देखील आप्पालाल शेख विजेते होते. आप्पालाल शेखयाचं मृत्यू समयी ५५ वर्षे इतक वय होतं. त्यांच्या अकाली जाण्याने लाल मातीवर शोककळा पसरली आहे. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारे तसेच हे नामवंत मल्ल होते.

 

आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा

आप्पालाल यांचे बंधू इस्माईल शेख हे १९८० सालचे महाराष्ट्र केसरी होते. त्यांच्यापाठोपाठ १९९२ साली आप्पालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्यामुळे आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा होता असचं होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी