Sadabhau Khot : सोलापूर : येड्यांच्या मागे ईडी लागली आहे अशी टीका आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केली आहे., तसेच जे शेतकर्यांची वीज कापायला आले तर हातात दांडके घेऊन त्यांना सोलून काढले जाईल असेही खोत म्हणाले.
सदाभाऊ खोत म्हणाले की, येड्यांच्या मागे इडीची चौकशी लागलेली आहे. पण ज्यांच्याकडे शहाणपणा आहे,जे सज्जन आहेत त्यांना वेड्यांच्या रुग्णालयात भरती करण्याची गरज नाहीये. सध्या महाराष्ट्रात मोठं मोठे नेते आणि त्यांच्या नातेवाईकांवर इडीच्या छाप्यांचं सत्र सुरूय त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय. तसेच शेतकऱ्यांची वीज कापायला आलात तर हातात दांडके असतील,त्याने सोलून काढलं जाईल. महाविकास आघाडी सरकारने आता शेतकऱ्यांना 'वीजबिल माफी'चं द्यावी लागेल असं मत सदाभाऊंनी व्यक्त केलंय. 'पवारांच्या जवळ गेले, पवारांनी कधी गिळले हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले'. सोलापुरातील युवा सेनेच्या मेळाव्यात काल भूम - परंड्याचे आमदार तानाजी सावंत यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली होती, त्यावर सदाभाऊ खोतांनी काव्यात्मक पद्धतीने प्रतिक्रिया दिलीय, खोत म्हणाले की, ‘तानाजी सावंत यांनी काँग्रेस - राष्ट्रवादीवर केलेली टीका म्हणजे त्यांच्या मनातील खदखद आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातील ६०% निधी राष्ट्रवादी, ३०% निधी काँग्रेस आणि १५% निधी हा शिवसेनेला आहे. त्यामुळे 'सत्तेसाठी हे पवारांजवळ गेले,पवारांनी कधी गिळले, हे शिवसेनेला सुद्धा नाही कळले'असं म्हणत सदाभाऊंनी शिवसेनेला चिमटा काढला आहे.