संभाजीराजे आक्रमक, 'भाजपचा खासदार आहे म्हणून त्यांची शाल घालून फिरत नाही'

सोलापूर
अजहर शेख
Updated Feb 20, 2021 | 21:52 IST

mp chhtrapati sambhajiraje angry : “शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे.” असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

mp chhtrapati sambhajiraje angry
संभाजीराजे आक्रमक, 'भाजपचा खासदार आहे म्हणून त्यांची शाल घालून फिरत नाही'  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • संभाजीराजेंना टार्गेट केल्यास टीआरपी वाढतो
  • पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी
  • माझा राग पुरातत्व खात्यावर आहे

सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज (chatrapati shivaji maharaj) यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त रायगड किल्ल्यावर (raigad fort) पुरातत्व खात्याकडून विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. मात्र, शिवरायांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे (mp chhatrapati sambhajiraje) या रोषणाई व्यवस्थेवर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय पुरातत्व खात्यासाठी हा काळा दिवस असल्याचं संभाजीराजे यांनी म्हणत अशा विद्युत रोषणाइने रायगडचे पावित्र्य राहत नाही असं म्हटलं होतं. यावर शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांनी संभाजीराजेंना दृष्टीकोन निगेटिव्ह ठेवला, तर सगळंच निगेटिव्ह वाटतं, असा टोला लगावला होता. मात्र, खासदार छत्रपती संभाजीराजे हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असल्याचे पाहायला मिळाले आहे. पंढरपूर मध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?

शांत, संयमी स्वभावाचे संभाजीराजे हे पहिल्यांदा आक्रमक पाहायला मिळाले. पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, किल्ले रायगडवरून कुणी आरोप केल्यास गाठ माझ्याशी आहे. “मी भाजपकडून खासदार आहे म्हणून त्यांची शाल घेऊन फिरत नाही” माझा राग पुरातत्व खात्यावर आहे. “मी कधीच राजकारण केलं नाही आणि करत नाही. किल्ल्यावरून मला राजकीय टॅग करू नका. अन्यथा गाठ माझ्याशी आहे”, असा इशारा देखील छत्रपती संभाजीराजेंनी यांनी दिला आहे.

संभाजीराजेंना टार्गेट केल्यास टीआरपी वाढतो

दरम्यान, पुढे संभाजीराजे म्हणाले की, मी समाजासाठी अहोरात्र महाराष्ट्र पिंजून काढतोय. “मी काहीही राजकीय फायदा घेतल्याचा, स्टंट केल्याचं दाखवा, तसं दिसलं तर मी माझी खासदारकी फेकून देतो. संभाजीराजेंना टार्गेट केल्यास टीआरपी वाढतो”, असा टोला संभाजीराजेंनी यांनी लगावला आहे. किल्ले जतन करण्यासाठी फोर्ड फेडरेशन स्थापन करण्यात आली आहे. पण जतन आणि संवर्धनचा अर्थ देखील पुरातत्व विभागाला माहिती आहे का?”, असा सवाल संभाजीराजेंनी केला आहे.

पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी

महाराजांचे वास्तव, समाधी असलेल्या रायगडावर अशी लायटिंग चुकीची आहे. पुरातत्व खात्याने गाईडलाइन तयार करावी. रायगड मॉडेल प्रमाणे दहा किल्ले संवर्धनासाठी घेणार असं देखील त्यांनी म्हटलं आहे. “शिवजयंतीच्या दिवशी रायगड किल्यावर करण्यात आलेली विद्यूत रोषणाई पाहून पुरातत्व खात्यासाठी कालचा दिवस हा खरंच काळा दिवस आहे.” असं संभाजीराजे यांनी म्हंटल आहे.

अजित पवार काय म्हणाले? 

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. पुन्हा असा प्रकार होऊ नये यासाठी प्रशासनाला यापुढे काळजी घ्यावी लागेल”, असं अजित पवार म्हणाले. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डीजे लाईट लावणं ही बाब अतिशय गंभीर आहे. काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात. यात काहीवेळा अजाणतेपणी म्हणा किंवा फार उत्साहामध्ये म्हणा अशा गोष्टी होतात. या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी