Unique Hotel । कितीही खा, बिल न मागणाऱ्या महाराष्ट्रातील हॉटेलची अनोखी कहाणी... 

Unique Hotel in Solapur । बातमी सोलापुरातल्या एका अनोख्या हॉटेलची, हॉटेल आलं तर साहजिकच बिल ही आलंच. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता जेवण करून खुर्चीवरून उठण्याअगोदरच तुमच्या समोर बिल ठेवलं जात, मात्र त्याला सोलापूर जिल्ह्यातील एक हॉटेल अपवाद आहे, इथे बिल तर सोडा तुम्ही पैसे नाही दिले तरी चालते. होय हे खरं आहे.

Unique Hotel । कितीही खा, बिल न मागणाऱ्या महाराष्ट्रातील हॉटेलची अनोखी कहाणी... 
बिल न मागणाऱ्या हॉटेलची अनोखी कहाणी  
थोडं पण कामाचं
  • बातमी सोलापुरातल्या एका अनोख्या हॉटेलची, हॉटेल आलं तर साहजिकच बिल ही आलंच.
  • एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता जेवण करून खुर्चीवरून उठण्याअगोदरच तुमच्या समोर बिल ठेवलं जात,
  • मात्र त्याला सोलापूर जिल्ह्यातील एक हॉटेल अपवाद आहे,

Unique Hotel in Solapur । सोलापूर : बातमी सोलापुरातल्या एका अनोख्या हॉटेलची, हॉटेल आलं तर साहजिकच बिल ही आलंच. एखाद्या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता जेवण करून खुर्चीवरून उठण्याअगोदरच तुमच्या समोर बिल ठेवलं जात, मात्र त्याला सोलापूर जिल्ह्यातील एक हॉटेल अपवाद आहे, इथे बिल तर सोडा तुम्ही पैसे नाही दिले तरी चालते. होय हे खरं आहे. या हॉटेलमध्ये तुम्ही नाश्ता खाऊन झाल्यावर तुम्ही द्याल ते बिल स्वीकारलं जात. कोणतं आहे ते हॉटेल पाहुयात, आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांचा स्पेशल रिपोर्ट (No matter how much you eat, a unique story of a unique hotel in Maharashtra that does not ask for meal money ...)

अधिक वाचा : ​घरी बनवा साध्या सोप्या पद्धतीनं मसाला खाखरा

सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील शावळ येथील या हॉटेलमध्ये खवय्यांची जमलेली गर्दी ही जशी इथे मिळणाऱ्या चवदार नाश्त्यासाठी आहे, तशीच गर्दी शिवपाद किणगे उर्फ महाराज यांच्या उदारमतवादी धोरणामुळेही आहे. तुम्ही किती खाल, काय नाश्ता खाल, याचा हिशोब नसतो, ना तुम्हाला बिल दिल जाते , ना बिल मागितलं जाते.  येऊन मनसोक्त नाश्ता आपण करायचा आणि आपल्याला किती बिल द्यायचे ​हे खाणाऱ्यानेच ठरवायचे. पैसे नसतील तरी काही हरकत नाही, तरीही विचारलं जात नाही, दिलेले पैसे आनंदाने हात जोडून इथे स्वीकारले जातात. 

शिवपाद किणगे  हे ७० वर्षीय गृहस्थ हॉटेल चालवितात, हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाचे हात जोडून नम्रतेने स्वागत केले जाते, ख्याली खुशाली विचारली जाते.  

शिवपाद किणगेंच्या सेवा भावी वृत्तीमुळे साऱ्या पंचक्रोशीत त्यांना किणगे महाराज म्हणून ओळखले जाते. या हॉटेल परिसरातून जाताना पैसे नसतील किंवा कमी असतील तरी भाऊसाहेब खाऊन जावा पैसे नसले तरी चालेल  असे शब्द  किणगे महाराजांच्या ओठी असतात.  कारण प्रत्येकाला समाधानी ठेवलं तर मला देव कमी करणारा नाही, अशी भावना किणगे महाराजांच्या मनात आहे.

अधिक वाचा : ​घरी कसे बनवायचे व्हेज हक्का नूडल्स, जाणून घ्या सोपी पद्धत

शिवपाद दहा वर्षांचे असताना त्यांचे आईवडीलांचे निधन झाले. आजीने त्यांचा सांभाळ केला. लहानपणापासून प्रामाणिकपणे पडेल ते काम करून त्यांनी गुजराण केली. सुरुवातीला काही दिवस त्यांनी दुधाचा व्यवसाय केला, पण त्यात मन रमलं नाही. मग गावातल्या लोकांना शाळेतल्या मुलांना पाणी वाटपाचे काम करू लागले.  

शाळेतल्या मुलांना आणि वाटसरुंना पाणी देण्यापासून सुरू झालेला प्रवास आज हॉटेलच्या सेवेच्या माध्यमातून  प्रत्येक ग्राहकाच्या  मनापर्यंत पोहोचलाय. 

अधिक वाचा : ​नाश्त्यासाठी झटपट बनवा तोंडाला पाणी सुटेल असा पराठा

​गेल्या 29 वर्षांपासून हॉटेल अशाच सेवाभावी वृत्तीने चालवीत आहेत,​ शावळ हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे इथे भौतिक सुविधांचा अभाव आहे, खराब रस्ते आणि गावात मुक्कामाची आणि जेवण्याचे हाल होत असल्यामुळे गावाची एस. टी बंद पडली होती. मात्र एसटी कर्मचाऱ्यांना आपल्या घरासारखे जेवण त्यांची काळजी शिवपाद यांच्याकडून घेतली जात असल्यामुळे गावात एसटीची  सुविधा पुन्हा सुरू झाली. आजूबाजूला अनेक गाव खेडी आहेत, शहरात जाऊन नाश्ता करणे अनेक गावातील गावकऱ्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी शिवपाद यांचं हॉटेल म्हणजे अगदी हक्काची जागा वाटते. 

तुम्ही कधी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असणाऱ्या शावळमध्ये गेलात तर तुम्हाला याचा नक्कीच अनुभव येईल.  नाश्ता केल्यानंतर पैसे कमी असतील किंवा नसतील तरी बिनधास्त रहा. किंवा तुम्ही पैसे नाही दिले तरी तुम्हांला आडकाठी करणार नाही. किंवा पोलीसात तक्रार करणार नाही. तर मग या आणि या अनोख्या हॉटेलच्या अनोखंपण तुमच्या डोळ्यांनी पाहा आणि अनुभव घ्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी