No Mobile Use : शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल वापरता येणार नाही, शाळा व्यवस्थापन समिती मोबाईल करणार जप्त, तुमच्या शाळेत तर नाही ना?

विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम करण्यात आला आहे. तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार असा इशाराही देण्यात आली आहे. स्टाफरूम व्यतिरिक्त इतर ठिकाणी शिक्षकांनी मोबाईल वापरू नये असा नियम करण्यात आला आहे.

mobile use
मोबाईल वापर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम करण्यात आला आहे.
  • नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार
  • स्टाफरूम व्यतिरिक्त इतर ठिकाणी शिक्षकांनी मोबाईल वापरू नये असा नियम करण्यात आला आहे.

No Mobile Use in School : सोलापूर :  विद्यार्थ्यांना शिकविताना आता शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, असा नियम करण्यात आला आहे. तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई होणार असा इशाराही देण्यात आली आहे. स्टाफरूम व्यतिरिक्त इतर ठिकाणी शिक्षकांनी मोबाईल वापरू नये असा नियम करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेने हा नियम केला आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी ही माहिती दिली आहे. अनेक शिक्षक शाळेत जाताना मोबाईल घेऊन जातात. वर्ग सुरू असताना शिक्षक वर्ग सोडून मोबाईलवर बोलण्यात व्यग्र होतात. त्यामुळे मुलांना शिकवण्यात व्यतय येतो. अशा वेळी शिक्षकांनी वर्गात जाताना मोबाईल स्विच ऑफ करावा किंवा सायलेंट मोडवर ठेवावा अशी सूचना करण्यात आली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडे पूर्ण लक्ष देऊन त्यांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. या नियमांचे पालन न केल्यास शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी दिला आहे. शिक्षकांना एकदा किंवा दोनदा दंडात्मक कारवाई केल्यानंतरही आपल्या वर्तनात सुधारणा न केल्यास मोबाईल जप्त करण्यात येईल असेही स्वामी म्हणाले. 

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी शिक्षकांना गणवेशाची सक्ती केली होती. पण, काही महिन्यांनी तो नियम मागे घेण्यात आला होता. शिक्षकांना मुख्यालयात राहण्याचे ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाने अनेकदा आदेश काढूनही बहुतेक शिक्षक नुसते प्रमाणपत्र सादर करतात, प्रत्यक्षात ते शहराच्या ठिकाणी राहतात, असे निदर्शनास आले. त्यामुळे आता जूनपासून शिक्षकांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणी होणार आहे. 

दुसरीकडे, नवीन शैक्षणिक वर्षापासून शिक्षकांना शाळेत मोबाईल घेऊन जाता येइल, पण शिकवताना किंवा व्हरांड्यात त्यांना मोबाईल वापरता येणार नाही. तसेच शाळेच्या वेळेत शैक्षणिक कामाव्यतिरिक्त त्यांना शाळा सोडून जाता येणार नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत तसा प्रकार आढळल्यास मुख्याध्यापकांवरही कारवाई होणार आहे. शिक्षकांच्या वर्तनाचे लहान मुले अनुकरण करतात, त्यामुळे जून २०२२ पासून  म्हणजेच नवीन शैक्षणिक वर्षात या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. जूनपासून शिक्षकांना ते ज्या ठिकाणी काम करतात तेथील मुख्यालयात राहणे बंधनकारक असेल. दुसरीकडे, शिक्षकांनी मुलांना शिकविताना तथा स्टाफरूमबाहेर असताना मोबाईल वापरू नये, जेणेकरून मुलांवर विपरीत परिणाम होइल, असे वर्तन नको. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाइ केली जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी