Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न, विठ्ठलाकडे मागितला आशीर्वाद अन् सुबुद्धी

सोलापूर
भरत जाधव
Updated Nov 04, 2022 | 10:28 IST

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली.

Official Mahapuja by the Deputy Chief Minister
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पांडुरंगाने शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर करावीत.
  • नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामदेव पगडी घालून सत्कार केला
  • औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा मान मिळाला.

Kartiki Ekadashi : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi)निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाली. यावर्षी मानाचे वारकरी म्हणून औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि कलावती साळुंखे यांना पुजेचा (worship) मान मिळाला. साळुंखे दाम्पत्य फुलंब्री तालुक्यातील शिरोड खुर्द गावातील रहिवाशी आहेत. या पुजेच्या वेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तान्हाजी राव सावंत उपस्थित होते. तसेच महापूजेच्या वेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, हरिभाऊ बागडे, बनन पाचपुते, समाधान अवताडे, गोपीचंद पडळकर, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणदेखील उपस्थित होते.  (Official Mahapuja by the Deputy Chief Minister, blessings and wisdom sought from Vitthala)

अधिक वाचा  : 'या' गोष्टीला चिडून हल्लेखोरानं इमरान खानवर झाडली गोळी

कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपुरात वारकरऱ्यांचा मेळा भरला आहे. विठुनामाच्या गजरात वारकरी दंग आहेत. पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी उपमुख्यमंत्र्यांचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आगमन झाले. श्री विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंत्रोपचारामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. महापूजेसाठी रात्री 12 वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले होते. यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील साळुंखे दाम्पत्याला पुजेचा मान देण्यात आला होता. गेली  50 वर्षे त्यांनी पंढरीची वारी केली आहे. माधवराव साळुंखे  हे समाज कल्याण विभागातून  सेवानिवृत्त झाले आहेत. गेली 50 वर्षापासून ते पंढरपूरची वारी करत आहेत. 

अधिक वाचा  : Vivah Muhurat : आज 4 नोव्हेंबरनंतर सुरू होतील मंगल कार्य

शासकीय महापूजेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्निक श्री संत नामदेव वाड्याला भेट देऊन नामदेवरायांचे दर्शन घेतले. नामदेव महाराजांच्या 17 व्या वंशजांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामदेव पगडी घालून सत्कार केला. यावेळी अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळली.  पुजेनंतर माध्यमाशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पांडुरंगाने शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर करावीत. शेतकरी आणि कष्टकरी सुखी करण्यासाठी आम्हाला पांडुरंगाने शक्ती, आशीर्वाद आणि सुबुद्धी द्यावी. सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणाचंही नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन पंढरपूरच्या विकास आराखड्याचे काम हातात घेऊ.’

मंदिर 2023' डायरीचे प्रकशन

शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर 'मंदिर 2023' डायरी चे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन झाले. तसेच विठ्ठल रुक्मिणी दागिन्यांच्या अल्बमचेही प्रकाशन झाले. 

पंढरपूर ते घुमान सायकल वारीला दाखवला झेंडा 

संत नामदेव महाराजांनी अवघ्या विश्वाला दिलेल्या समता, बंधुता या संदेशाला उजाळा देण्यासाठी पंढरपूर ते घुमान निघालेल्या सायकल वारीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. 75 वर्षाच्या भावे आज्जी देखील या सायकल वारीत सहभागी होणार आहेत. त्या 2 हजार 300 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. 

ही सायकल वारी महाराष्ट्र आणि उत्तर भारतातील स्नेह वाढवणारा ठरेल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आज पहाटे या सायकल वारीला उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी झेंडा दाखवल्यावर सुरुवात झाली. या सायकल वारीसाठी 105 सायकलस्वार सहभागी झाले आहेत. यात 90 जेष्ठ नागरिक असलेले सायकल स्वार तर 165 महिला सायकल स्वार सहभागी झाले आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी