विठ्ठलाच्या चरणावर तब्बल 'एवढ्या' कोटीची देणगी

pandharpur ashadhi yatra five crore seventy lakh rupees donation received : यावर्षी अनेक भाविक पंढरपूर आषाढी यात्रेला आले होते. त्यामुळे मंदिराच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. दरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे (vitthal) पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे

pandharpur ashadhi yatra five crore seventy lakh rupees donation received
विठ्ठलाच्या चरणावर तब्बल 'एवढ्या' कोटीची देणगी  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • यावर्षी पंढरपूर आषाढी यात्रेचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला
  • यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर
  • गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली

पंढरपूर : देशात २ वर्षापासून कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. त्यामुळे, मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र, कोरोनाची लाट आटोक्यात आल्याने सध्या सर्व धार्मिक स्थळे सुरु आहेत. त्यामुळे यावर्षी पंढरपूर (pandharpur) आषाढी यात्रेचा (ashadhi wari) सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असून,यात्रेदरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे (vitthal) पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक वाचा : भीषण अपघात; एसटी बस पुलावरून कोसळली, 13 जणांचा मृत्यू

यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर

यावर्षी अनेक भाविक पंढरपूर आषाढी यात्रेला आले होते. त्यामुळे मंदिराच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. दरम्यान सुमारे सात ते आठ लाख भाविकांनी विठुरायाचे (vitthal) पदस्पर्श आणि मुख दर्शन घेतले. यावेळी भाविकांनी विठ्ठलाच्या चरणावर जवळपास पाच कोटी सत्तर लाख रुपयांची देणगी अर्पण केली आहे. दोन वर्षाच्या तुलनेत यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

अधिक वाचा : राज्यात अतिवृष्टीचा तडाखा; मुसळधार पावसानं घेतले 104 जणांचे

गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली

राज्यात गेली २ वर्ष कोरोनाचे मोठे सावट होते. त्यामुळे धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र, पारंपारिक विधिवत पूजा केल्या जात होत्या. परंतु गेली दोन वर्ष आषाढी वारी मर्यादित वारक-यांच्या उपस्थितीत पार पाडली. त्यामुळे यंदा पंढरपूरात भाविकांची मांदियाळी होती. यंदाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यंदा सात ते आठ लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले होते.

अधिक वाचा : अमरावतीत भीषण अपघात..! दोन वाहनांच्या धडकेत 6 जण जागीच ठार 

यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले

दरम्यान, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी म्हटलं आहे की, भाविकांनी मंदिर समितीला देणगी स्वरूपात दान केल्यास समितीच्या वतीने भाविकांसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. त्याचबरोबर यावर्षी विठ्ठलाला सोने आणि चांदीचे दागिने ही मोठ्या प्रमाणावर भाविकांनी दान केले आहेत. यंदाच्या आषाढी यात्रेत एक कोटी तीस लाख रुपयांची देणगीत भर पडली आहे असल्याचं देखील गुरव यांनी म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सन २०१९ मध्ये झालेल्या आषाढी यात्रेत विठ्ठल मंदिर समितीला चार कोटी चाळीस लाख रुपयांची देणगी मिळाली होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी