पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'एवढे' झाले मतदान

सोलापूर
अजहर शेख
Updated Apr 18, 2021 | 14:48 IST

pandharpur assmbaly by- election : आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्यासाठी तर कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी स्थानिक  पातळीवर यंत्रणेची धुरा सांभाळली

pandharpur assmbaly by- election
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत 'एवढे' झाले मतदान  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • समाधान आवताडे यांना भाजपने तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले
  • पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या ३४०८८९ इतकी
  • पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी ३२८ मूळ मतदान केंद्र असून १९६  सहायक मतदान केंद्र

सोलापूर – पंढरपूरचे आमदार भारत भालके (bharat bhalke) यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघासाठी (pandharpur assembaly constitusy) पोटनिवडणूक पार पडली असून, सदर पोटनिवणुकीत ६६.१५ टक्के इतके मतदान झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात चांगल्या प्रकारे मतदान पार पडले. महाविकासआघाडीने भारत नाना भालके यांचे पुत्र भगीरथ भालके (candidate bhagirath bhalke) यांना उमेदवारी दिली होती. तर भारतीय जनता पार्टीकडून समाधान आवताडे (bjp candidate samadhan avatade) यांना उमेदवारी देण्यात आली. एकंदरीत पहायला गेले तर निवडणुकीत १९ जण आपले नशीब आजमावत असून, थेट लढत मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके आणि भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यातचं झाली असल्याचे पहायला मिळाले आहे.

स्त्री आणि पुरुष यांचे किती झाले मतदान?

पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात एकूण मतदारांची संख्या ३४०८८९ इतकी आहे. ज्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या १७८१९० इतकी आहे. तर महिला मतदाराची संख्या ही १६२६९४ इतकी आहे. आणि अन्य ५ अशी एकूण मतदारांची आकडेवारी आहे. ज्यामध्ये झालेले मतदान हे पुढीलप्रमाणे आहे. पुरुषाचे एकूण १२०६८४ इतके मतदान झाले आहे. तर स्त्रियांचे १०४८०१ इतके मतदान झाले आहे. आणि इतर शून्य अशी एकूण मतदानाची आकडेवारी आहे.

पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी ३२८ मूळ मतदान केंद्र १९६  सहायक मतदान केंद्र

या पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी ३२८ मूळ मतदान केंद्र असून १९६ सहायक मतदान केंद्र होती. या मतदान केंद्रासाठी ५२४ कंट्रोल युनिट, १०४८ बॅलेट युनिट, ५२४ विवी पॅड मशीन, २१० कंट्रोल युनिट, ४२० बॅलेट युनिट राखीव होती. तसेच या निवडणुकीसाठी २५५२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. 

समाधान आवताडे यांना भाजपने तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले

राज्यात चर्चेत राहिलेल्या या उत्साही मतदानाचा कौल कुणाला मिळणार हे येत्या २ मे रोजी लागणाऱ्या निकालातून स्पष्ट होणार आहे. साखर पट्ट्यातील ही निवडणूक असल्यामुळे अनेकांचे पंढरपूरकडे लक्ष लागले आहे. आमदार प्रशांत परिचारक यांनी समाधान आवताडे यांच्यासाठी तर कल्याणराव काळे यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी स्थानिक  पातळीवर यंत्रणेची धुरा सांभाळली. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांच्या सहानुभूतीचा विचार करुन राष्ट्रवादीने त्यांचा मुलगा भगीरथ भालके यांना मैदानात उतरविले होते, तर त्यांच्या विरोधात भाजपने मंगळावेढ्याचे उद्योजक आणि दोन निवडणुकांचा अनुभव असलेले समाधान आवताडे यांना तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले होते. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी