पंढरपूर पोटनिवडणूक निकाल: जयंत पाटलांची पावसातील सभा ठरली फेल; विजयामुळे भाजपला मिळाले 'समाधान'

सोलापूर
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 17:05 IST

देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा जोरात होत आहे, पण यापेक्षा त्याचबरोबर राज्यातील पंढरपूर -मंगळवेढा येथील विधान पोटनिवडणुकीच्या निकाल मोठा उत्सुकतेचा ठरला.

Pandharpur  Bypoll Election Result
पंढरपूर पोटनिवडणूक निकाल:जयंत पाटलांची पावसातील सभा ठरली फेल  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जयंत पाटील यांची पावसातील सभा ठरली फेल
  • भाजपचे समाधान अवताडे ७५०० मतांनी विजयी
  • एक्झिट पोलचा अंदाज ठरला खरा

पंढरपूर : देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा जोरात होत आहे, पण यापेक्षा त्याचबरोबर राज्यातील पंढरपूर -मंगळवेढा येथील विधान पोटनिवडणुकीच्या निकाल मोठा उत्सुकतेचा ठरला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी येथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार झटका मिळाला आहे.  भाजपचे समाधान आवताडेंनी ७,५०० मतांनी आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला. अद्यापत याची अधिकृत घोषणा मात्र झालेली नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने भारत भालके यांच्या मुलाला म्हणजेच भागीरथ भालके यांनी तिकट देत निवडणूक लढविण्यास सांगितलं. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली होती. दोन्ही पक्ष आपआपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत होते. या प्रयत्नात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील पावसातील सभेची कॉपी करत पंढरपूर येथे पावसात सभा घेतली. शरद पवार यांनी साताऱ्याच्या पावसात ज्याप्रकारे आग लावली त्याचप्रमाणे जयंत पाटलांनी प्रयत्न केला परंतु पंढरपूरच्या पावसात मात्र साताऱ्याच्या पावसा इतका जोर दिसला नाही.

दरम्यान, विजयानंतर पंढरपुरात कोरोना नियम केराच्या टोपलीत टाकल्याचे दिसत आहे. भाजपकडून विजयोत्सव साजरा केला जात आहे. समाधान अवताडे यांची विजयी मिरवणूक काढलेल्याचे चित्र पंढरपुरात दिसत आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीमुळे येथे सध्या मतमोजणी केंद्रावर फक्त 14 टेबलच मांडण्यात आलेले होते. जमावबंदीचे आदेशही जारी करण्यात आले होते. मात्र विजयानंतर हे नियम पाळले नसल्याचे दिसत आहे. पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना होता. भाजपाच्या समाधान आवताडे यांना २५ व्या फेरीअखेर ६ हजार ३३४ मतांची आघाडी मिळाली होती.

कुणाला किती टक्के मतदान?

एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात ४५ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये  ३६  टक्के आणि मंगळवेढ्यात ४६  टक्के असे त्यांना सरासरी ४४ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात  ४७  टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये  ४३  टक्के आणि मंगळवेढ्यात ४० टक्के असे त्यांना सरासरी ४२  टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी ३ टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी ४ टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी ४ टक्के मतदान होताना दिसत आहे. दरम्यान एक्झिट पोलनुसार अवताडे हे विजयी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी