Pandharpur Corridor : पंढरपूर : पंढरपूरला वर्षाला एक कोटी भाविक भक्त येतात. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी काशीच्या धर्तीवर विठ्ठल मंदिर परिसरात कॉरिडॉर पादचारी रस्ता करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. कॉरिडॉर आणि तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी राज्य सरकारने दोन हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. परंतु या कॉरिडॉरमुळे सातशे कुटुंब बाधित होणारेत. शिवाय व्यापार्यांच्या समोर पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होणारे. त्यामुळे या कॉरिडॉरला तीव्र विरोध होत आहे. (pandharpur citizen opposed pandharpur corridor protest in temple)
यासाठी नागरिकांनी सर्व पक्षीय मोर्चा काढलाय. तसेच मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करून जोरदार विरोध व्यक्त केलाय. या कॉरिडॉरला दिवसेंदिवस विरोध वाढत चालला आहे. वार करी संप्रदायानेही या कॉरिडॉरला विरोध करून मंदिरासमोर भजन आंदोलन केले आहे.