Pandharpur Result :भाजप विजयाच्या उंबरठ्यावर; २५ व्या फेरीअखेर आवताडेंना ६ हजार ३३४ मतांची आघाडी

सोलापूर
भरत जाधव
Updated May 02, 2021 | 14:53 IST

देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Pandharpur Result
Pandharpur :भारत भालके की समाधान आवताडे? आवताडेंना आघाडी   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल
  • एक्झिट पोलनुसार समाधान आवताडेंना मिळणार विजय
  • पंधराव्या फेरीअखेर आवताडेंना आघाडी

पंढरपूर: देशात आज ५ राज्यांच्या निकालांची चर्चा आणि उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच महाराष्ट्रातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पंढरपुरात सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाकडून समाधान अवताडे आणि महाविकासआघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात थेट सामना पाहायला मिळत आहे. नियमांप्रमाणे आधी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली आहे. भाजपाच्या समाधान आवताडे यांना २५ व्या फेरीअखेर भाजपाच्या अवताडे यांच्याकडे ६ हजार ३३४ मतांनी आघाडी आहे. सतराव्या फेरीपर्यंत अवताडेंना ७५ हजार ७३ मतं मिळाली तर भालकेंना एकूण ६८ हजार ७३९ मतं मिळाली

यापुर्वी . भाजपाच्या समाधान आवताडे यांना पंधराव्या फेरीअखेर ३ हजार ८०० मतांची आघाडी मिळाली. मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिल्या फेरीत भाजपाच्या समाधान अवताडेंनी ४५० मतांनी आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत अवताडेंना २ हजार ८४४ तर भालकेंना २ हजार ४९४ मतं मिळाली. दुसऱ्या फेरीत मात्र भालकेंनी ५०० हून आधिक मतांची आघाडी मिळवली. दुसऱ्या फेरीत भालकेंना ३ हजार ११२ तर अवताडेंना २ हजार ६४८ मतं मिळाली. तिसऱ्या फेरीअखेरीस भालकेंनी ६३५ मतांची आघाडी मिळवलीय. भालकेंना तिसऱ्या फेरीनंतर एकूण ८ हजार ६१३ मते मिळाली आहेत तर आवताडेंना ७ हजार ९७८ मते मिळाली आहेत.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्याने पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले.  या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली. भालके यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे.

असा आहे एक्झिट पोलचा अंदाज 

या निवडणुकीनंतर पुण्याच्या 'द स्ट्रेलेमा' या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केला आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना ९५५०८, समाधान आवताडे यांना ९८९४६, अपक्ष उमेदवार  सिद्धेश्वर आवताडे यांना  ७१२४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना ८६१९, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना  ६५९६ आणि इतरांना ८६९३  मते मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे ३४३८ मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. 

कुणाला किती टक्के मतदान?

एक्झिट पोलनुसार समधान आवताडे यांना पंढरपूर शहरात ४५ टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये  ३६  टक्के आणि मंगळवेढ्यात ४६  टक्के असे त्यांना सरासरी ४४ टक्के मतदान होताना दिसत आहे. तर भगीरथ भालके यांना पंढरपूर शहरात  ४७  टक्के, पंढरपूर ग्रामीणमध्ये  ४३  टक्के आणि मंगळवेढ्यात ४० टक्के असे त्यांना सरासरी ४२  टक्के मतदान होताना दिसत आहे. तर सिद्धेश्वर आवताडे यांना सरासरी ३ टक्के, सचिन शिंदे यांना सरासरी ४ टक्के, शैला गोडसे यांना सरासरी 3 टक्के आणि इतरांना सरासरी ४ टक्के मतदान होताना दिसत आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी